Join us
Daily Top 2Weekly Top 5

जुई गडकरीसाठी प्रेम म्हणजे नक्की काय? उत्तराने वेधलं चाहत्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 09:36 IST

जुईने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील 'प्रेमाची' व्याख्या स्पष्ट केली आहे, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Tharala Tar Mag Fame Jui Gadkari Talks About Love : 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' मधील लाडकी सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी आज घराघरांत पोहोचली आहे. टीआरपीमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या या मालिकेतील सायली आणि अर्जुनची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. नुकतंच व्हॅलेंटाईन डे साजरा झाला. यातच जुईने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील 'प्रेमाची' व्याख्या स्पष्ट केली आहे, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

मराठी वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत जुईला विचारण्यात आले की, 'प्रेमाला जर एकाच शब्दात मांडायचं असेल तर तू काय म्हणशील?' यावर जुईने अतिशय सुंदर उत्तर दिले. जुई म्हणाली, "माझ्यासाठी प्रेम म्हणजे आपली 'Safe Place' (सुरक्षित जागा). जगात कुठेही काहीही सुरू असो, पण ती एक व्यक्ती आपल्यासोबत असताना आपल्याला सुरक्षित वाटतं, तेच माझ्यासाठी खरं प्रेम आहे".

"प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाईन डे"केवळ १४ फेब्रुवारीलाच प्रेम व्यक्त करावं का? यावर जुईने तिचे स्पष्ट मत मांडले. ती म्हणाली, "प्रेमासाठी असे विशेष दिवस साजरे करण्याची गरज लागत नाही. मला असं वाटतं की, जर योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात असेल, तर प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाईन डे असतो".

English
हिंदी सारांश
Web Title : Jui Gadkari's Definition of Love Captivates Fans: A Quick Look

Web Summary : Actress Jui Gadkari, known for 'Tharala Tar Mag,' shared her definition of love, describing it as a 'safe place.' She believes love shouldn't be limited to Valentine's Day, but celebrated every day with the right person.
टॅग्स :जुई गडकरी