Join us

थाटामाटात पार पडलं 'ठरलं तर मग' फेम मोनिका दबडेच्या लेकीचं बारसं; नाव काय ठेवलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 18:32 IST

'ठरलं तर मग' फेम मोनिका दबडेच्या लेकीचं बारसं, नाव ठेवलंय खूपच खास

Monika Dabade Post: स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' (tharla tar mag) ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. या मालिकेप्रमाणे त्यातील पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळंच स्थान निर्माण केलं.  अलिकडेच या मालिकेतील अस्मिता म्हणजेच अर्जुनच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मोनिका दबडेच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. मोनिकाने १५ मार्च या दिवशी गोंडस मुलीला जन्म दिला. आता अभिनेत्रीच्या लेकीचा नामकरण सोहळा थाटामाटात पार पडला आहे. याचबद्दल सोशल मीडिवर मोनिकाने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे. 

मोनिका दबडे तिचा पती  चिन्मय कुलकर्णी यांना कन्यारत्न प्राप्त झाले. होळीच्या दुसऱ्या दिवशी १५ मार्च रोजी मोनिकाने गोंडस लेकीला जन्म दिला. त्यानंतर जवळपास महिन्यानंतर अभिनेत्रीने तिच्या लेकीचा नाव ठेवलं आहे. सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने त्यामध्ये लिहिलंय की, आमची "वृंदा" म्हणजे "पवित्र तुळस...", तुमच्या सगळ्यांचे प्रेम आणि आशिर्वाद सदैव असुद्या !!!" अशा आशयाची पोस्ट अभिनेत्रीने शेअर केली आहे. 

दरम्यान, मोनिकाने तिच्या लेकीचं नाव जाहीर करताच तिच्या चाहत्यांसह मराठी कलाविश्वातील कलाकारांनी वृंदा म्हणजेच तिच्या लेकीला कमेंट्सच्या माध्यमातून शुभाशीर्वाद दिले आहेत. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया