विजय सेतुपतीचा 'द गांधी टॉक्स' हा मुकपट अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. अलिकडेच ३० जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात 'ठरलं तर मग'मध्ये मधू भाऊंची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अभिनेते नारायण जाधव यांनीही काम केलं आहे. नारायण जाधव यांनी 'द गांधी टॉक्स'मध्ये विजय सेतुपतीसोबत स्क्रीन शेअर केली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या सिनेमाच्या शूटिंगचा अनुभव त्यांनी सांगितला. त्याबरोबरच विजय सेतुपतीला ओळखतही नव्हतो, असं वक्तव्यदेखील त्यांनी केलं आहे.
नारायण जाधव यांनी इट्स मज्जाला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, "विजय सेतुपती कोण आहे हे मला माहितच नव्हतं. कारण मी साऊथचे सिनेमे तितके बघत नाही. खरं म्हटलं तर आपण त्या त्रिमुर्तीमध्येच जास्त अडकलेले आहोत. दिलीप कपूर, राज कपूर, देवानंद, शमी कपूर सगळ्यांनीच चांगली कामं केली. जेव्हा मी दुसऱ्या दिवशी शूटिंगसाठी चाळीतील सेटवर गेलो आणि मी विचारलं की विजय सेतुपती कोण आहे? तेव्हा मला त्यांनी असं बोट वर करून दाखवलं. चेक्सचं शर्ट घातलेला साधा माणूस...मी म्हटलं हा स्टार आहे? मी म्हटलं हा खाली उतरला तर याला कोण ओळखणारही नाही. पण नंतर मग त्याचं ग्लॅमर कळायला लागलं".
'द गांधी टॉक्स' या सिनेमात विजय सेतुपतीसोबत अभिनेत्री अदिती राव हैदरी मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमात मराठी कलाकारांची फौज आहे. 'द गांधी टॉक्स'मध्ये नारायण जाधव यांच्यासोबत सिद्धार्थ जाधव, प्रियदर्शिनी इंदलकर, महेश मांजरेकर, उषा नाडकर्णी, वनिता खरात, रोहिणी हट्टांगडी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Web Summary : Narayan Jadhav, known for 'Tharla Tar Mag,' worked with Vijay Sethupathi in 'The Gandhi Talks.' He admitted he wasn't familiar with Sethupathi's work initially, focusing on classic Bollywood actors. The film also features Aditi Rao Hydari and other Marathi actors.
Web Summary : 'ठरला तर मग' के लिए जाने जाने वाले नारायण जाधव ने 'द गांधी टॉक्स' में विजय सेतुपति के साथ काम किया। उन्होंने स्वीकार किया कि वे शुरू में सेतुपति के काम से परिचित नहीं थे, क्लासिक बॉलीवुड अभिनेताओं पर ध्यान केंद्रित कर रहे थे। फिल्म में अदिति राव हैदरी और अन्य मराठी अभिनेता भी हैं।