Join us

"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."

By कोमल खांबे | Updated: September 24, 2025 11:52 IST

एका चाहत्याने अभिनेत्रीला तिच्या लग्नाबाबत मेसेज केला होता. लग्न करण्याचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईने सडेतोड उत्तर दिलं आहे. 

जुई गडकरी हा मराठी टेलिव्हिजन लोकप्रिय चेहरा आहे. जुईचा चाहता वर्ग मोठा असून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. करिअरसोबतच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती शेअर करताना दिसते. जुई चाहत्यांना रिप्लायही करते. असाच एका चाहत्याने अभिनेत्रीला तिच्या लग्नाबाबत मेसेज केला होता. लग्न करण्याचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईने सडेतोड उत्तर दिलं आहे. 

चाहत्याने जुईच्या इन्स्टाग्राम इनबॉक्समध्ये मेसेज केला होता. "जुई लग्न कर कोणीही असू दे पण कर...सल्ला आहे कारण वेळ नाहीये", असा मेसेज चाहत्याने केला होता. त्यानंतर जुईच्या स्टोरीलाही या चाहत्याने रिप्लाय दिला होता. "टीआरपी कमी होत आहे मॅडम. तुमचं मार्केटिंग कमी पडतंय. मेकअप आणि दिसणं वेगळं असतं. टीव्ही सिरियलमध्ये मॅडम तुम्ही मोठे असाल पण लग्न नाही फॅमिली नाही विचार करा", असं त्याने म्हटलं होतं. 

या चाहत्याच्या मेसेजचा स्क्रिनशॉट शेअर करत जुईने त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. "अशा माणसांची कीव येते. लवकर बरे व्हा...देव तुमचं भलं करो. देवाच्या कृपेने तुमचा त्रास लवकरात लवकर कमी होवो", असं जुईने म्हटलं आहे. सध्या जुई 'ठरलं तर मग'मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती साकारत असलेली सायली प्रेक्षकांना भावते.

टॅग्स :जुई गडकरीटिव्ही कलाकार