Join us

​थपकी प्यार की... घेणार लीप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 14:10 IST

छोट्या पडद्यावर मालिकांनी लीप घेण्यात काही नवीन नाही. आता थपकी प्यार की ही मालिकादेखील लीप घेणार आहे. या मालिकेत ...

छोट्या पडद्यावर मालिकांनी लीप घेण्यात काही नवीन नाही. आता थपकी प्यार की ही मालिकादेखील लीप घेणार आहे. या मालिकेत प्रेक्षकांना सात वर्षांचा लीप पाहायला मिळणार आहे. थपकी प्यार की या मालिकेत आपले अस्तित्व शोधण्यासाठी धडपडत असलेली थपकी आपल्याला पाहायला मिळाली होती. आता लीपनंतर तिच्यासोबतच तिच्या मुलीचा प्रवास मालिकेत दाखवला जाणार आहे. या मालिकेत प्रेक्षकांना बिहान आणि थपकी या जोडप्याची प्रेमकथा पाहायला मिळाली होती. आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिल्यानंतर आता ते दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. पण त्यांचा हा आनंद काहीच दिवस टिकणार आहे. लवकरच त्यांची ताटातूट होणार आहे आणि त्यानंतर मालिकेत लीप घेतला जाणार आहे.लीपनंतर थपकी आणि बिहान आपले आयुष्य वेगवेगळे जगत असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. थपकी या सात वर्षांत एक क्राइम रिपोर्टर म्हणून स्वतःचे करियर प्रस्थापित करणार आहे. त्या दोघांच्या बानी आणि टीना या जुळ्या मुलीदेखील वेगवेगळ्या राहाणार आहेत. बीना थपकीसोबत तर टीना बिहानसोबत असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण बीना आणि टीना लवकरच एका समर कॅम्पमध्ये भेटणार आहेत. या सगळ्यामुळे थपकी आणि बिहानच्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळणार आहे. त्यांच्या आयुष्यात आणखी नवीन आव्हाने निर्माण होणार आहेत. याविषयी थपकीची भूमिका साकारणारी जिज्ञासा सिंग सांगते, "माझ्या कारकिर्दीची सुरुवात मी थपकी या मालिकेपासून केली आहे. या मालिकेच्या सगळ्याच टीमकडून मला खूप काही शिकायला मिळाले. लीपनंतर माझ्या व्यक्तिरेखेत अनेक बदल होणार असल्याचा मला खूप आनंद होत आहे" तर या मालिकेत बिहानची भूमिका साकारणारा मनिष गोपलानी सांगतो, "लीपनंतर बिहानचा लूक पूर्णपणे वेगळा असणार आहे तसेच माझ्या व्यक्तिमत्त्वातही खूप फरक पडणार आहे. प्रेक्षकांना माझा हा नवीन अवतार आवडेल अशी मला आशा आहे."