Join us
Daily Top 2Weekly Top 5

थलपति विजयच्या कुशीत चिमुकल्या बहिणीने सोडलेला जीव! गाडीची नंबर प्लेट अन् मुलीच्या नावाचं बहिणीशी आहे कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 17:25 IST

१९८४ साली वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी थलपतिच्या बहिणीचं निधन झालं होतं. बहिणीच्या निधनामुळे अभिनेता बदलला तो कायमचाच!

दाक्षिणात्य सुपरस्टार थलपति विजयने तामिळनाडूच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवलं. थलपति विजयच्या TVK पक्षाला १०० हून अधिक जागा मिळवल्या. थलपति उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असं बोललं जातंय. अशातच थलपतिच्या आयुष्यातील आजवर कधीही न ऐकलेली कहाणी समोर आली आहे. थलपतिच्या सख्ख्या बहिणीचं वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी निधन झालं. आजही थलपतिच्या मनात लाडक्या बहिणीला लवकर गमावल्याची खंत आहे. काय घडलेलं नेमकं?

विजयचा जन्म २२ जून १९७४ रोजी चेन्नईतील एका प्रतिष्ठित तमिळ चित्रपट कुटुंबात झाला. त्याचे पूर्ण नाव जोसेफ विजय चंद्रशेखर आहे. त्याचे वडील एस.ए. चंद्रशेखर हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत आणि आई शोभा चंद्रशेखर या पार्श्वगायिका आहेत. विजयला लहान बहीणही होती. जी त्याच्यापेक्षा ३ वर्षांनी लहान होती. तिचं नाव विद्या.

विजय आपल्या लहान बहिणीसोबत तासनतास खेळायचा. तिचे लाड करायचा. मात्र, दुर्दैवाने १९८४ मध्ये वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी एका आजारामुळे विद्याचे निधन झाले. ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा वडील एस.ए. चंद्रशेखर शूटिंगमध्ये व्यस्त होते. काही रिपोर्ट्सनुसार, विद्याने विजयच्या कुशीतच आपला अखेरचा श्वास घेतला होता. या प्रसंगाने विजयला आतून पूर्णपणे हादरवून टाकले.

या घटनेचा विजयच्या मनावर इतका खोल परिणाम झाला की त्याचा स्वभावच बदलून गेला. बहिणीच्या जाण्याने त्याच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली. विजयने आजही आपल्या बहिणीच्या आठवणी काळजात जपून ठेवल्या आहेत. तिच्या सन्मानार्थ त्याने आपल्या मुलीचे नाव 'दिव्या' ठेवले, जे नाव त्याला त्याची बहीण 'विद्या'ची आठवण करून देते. तसेच, विजय आपल्या खासगी गाड्यांसाठी '०२७७' हा खास नंबर वापरतो. हा नंबर त्याच्या बहिणीच्या वाढदिवसाशी (१४-०२-१९७७) संबंधित आहे.

एका मुलाखतीत विजयने सांगितले होते की, बहिणीच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी अनेक वर्षांनंतर चाहत्यांच्या प्रेमामुळे भरून निघाली, ज्यामध्ये त्याला अनेकदा आपल्या बहिणीचीच झलक दिसते. अशाप्रकारे आज सिनेसृष्टीत आणि राजकारणात यशाच्या शिखरावर असलेला विजय बहिणीच्या आठवणीने भावुक होतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Thalapathy Vijay's sister died in his arms; Untold story

Web Summary : Thalapathy Vijay's sister, Vidya, passed away at age 7. Deeply affected, Vijay named his daughter Divya in her memory and uses '0277,' linked to her birthdate, for his cars.
टॅग्स :थलपती विजयबॉलिवूडTollywood