Join us

तेजस्विनी म्हणते, कोणाची हिम्मत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 00:13 IST

 भाऊ-बहिणींच्या नात्यांचे प्रेम हे जगजाहीर आहे. 

 भाऊ-बहिणींच्या नात्यांचे प्रेम हे जगजाहीर आहे. एक भाऊ आपल्या बहिणीसाठी काहीही करण्यास तयार असतो.तसेच ज्यावेळी एक भाऊ व बहिण दोघे खांदयाला खांदा लावून तयार असतात त्यावेळी कोणाची हिंमत नसते त्यांच्याविरूद्ध स्टॅण्ड घ्यायची हे विचार तुमचे आमचे नसून चक्क,गुलाबाची कळी तेजस्विनी पंडीतचे आहेत. नुकतेच,या सुंदर अभिनेत्रीने मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर आपल्या भावासोबतचा एक फोटो क्लिक करून सोशलमिडीयावर टाकला आहे. आणि त्यावर तिने स्टेटस अपडेट केले आहे की, ज्यावेळी भाऊ बहिण खांद्याला खांदा लावून उभे असतात, त्यावेळी त्यांच्या विरूद्ध स्टॅण्ड घेण्याची कोणाची हिंमत आहे का? गुलाबाच्या कळीचा हा डॅशिगपणा व अ‍ॅटीटयूड पाहून तिचे दुश्मन घाबरले असतील हे नक्की.