Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बिग बॉस 17’च्या घरात नवा ड्रामा; जाणून घ्या कोण आहेत तहलका, खानजादी आणि सोनिया?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 23:56 IST

अभिनेत्री सोनिया बंसल, फिरोझा खान उर्फ खानजादी आणि तहलका भाई म्हणून लोकप्रिय असलेल्या सनी आर्याने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे.

बहुचर्चित 'बिग बॉस १७' ची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता बघायला मिळाली. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या आणि स्पर्धकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी बिग बॉस सज्ज आहे. यंदाच्या पर्वात कोण कोण सहभागी होणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. आता एकापाठोपाठ एक स्पर्धकांच्या नावाची घोषणा झाली.

अभिनेत्री सोनिया बंसल, फिरोझा खान उर्फ खानजादी आणि तहलका भाई म्हणून लोकप्रिय असलेल्या सनी आर्याने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे.  सनी आर्या हा सोशल मीडिया इन्फल्यूएंसर आहे. आता हा बिग बॉसच्या घरात काय गोंधळ घालणार हे पाहणे प्रेक्षकांसाठी मनोरंजक ठरणार आहे. 

 सोनिया बन्सल ही व्यवसायाने अभिनेत्री आणि मॉडेल आहे. हिंदी व्यतिरिक्त त्यांनी काही तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त ती अनेक म्युझिक अल्बममध्येही दिसली.  गॉडफादरशिवाय तिने अभिनय क्षेत्रात स्थान निर्माण केलं आहे. आता ती बिग बॉसमध्ये आपला दरारा निर्माण करु शकते की नाही, हे येत्या काळातच कळेल. 

फिरोजा खान ही बिग बॉस ओटीटी सीझन 2 मधील वादग्रस्त स्पर्धक जैद हदीदसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्याही समोर आल्या आहेत. तर 'तहलका भाई' अर्थात सनी आर्या हा  प्रँक स्टार म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचे प्रँक व्हिडिओ लोकांना खूप आवडतात. 

 

टॅग्स :बिग बॉसबॉलिवूडसलमान खान