Join us

'चिटर'चा टीजर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 22:56 IST

वैभव तत्ववादी काय चिटरपणा करतो याची उत्सुकता सर्वानाच होती. 

वैभव तत्ववादी काय चिटरपणा करतो याची उत्सुकता सर्वानाच होती. तसेच या चित्रपटाच्या एका झलकसाठी प्रेक्षकांनी वाट पहावी असे देखील वैभव व पूजा आणि चिटरची टीम वारंवार सोशल मिडीयावर सतत अपडेट करत होती. फायनली, या टीमने प्रेक्षकांची ही उत्सुकता संपवली आणि चिटर या चित्रपटाचा  टीजर प्रदर्शित केला. अजय फणसेकर दिग्दर्शित चिटर या चित्रपटात वैभव तत्ववादी, पूजा सावंत प्रमुख भूमिकेत पाहायला मिळतील. याव्यतिरिक्त आसावरी जोशी, ऋषीकेश जोशी, सुहास जोशी या कलाकारांचा देखील या चित्रपटात समावेश आहे. या चित्रपटाची ७० टक्के शुटिंग मॉरिशियस या ठिकाणी झाली असून ३० टक्के शुटिंग पुणे शहरात झाली आहे.