Join us

दुष्टांचा संहार करण्यासाठी येतेय 'तारिणी', मालिका लवकरच येतेय भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 20:16 IST

Tarini Serial: झी मराठीवर लवकरच एक नवी मालिका येतेय. तिचं नाव आहे 'तारिणी'.

झी मराठीवर लवकरच एक नवी मालिका येतेय. तिचं नाव आहे 'तारिणी' (Tarini Serial). तारिणी बेलसरे मुंबईत राहणारी. तारिणीची आई पोलिस खात्यात हेड कॉन्स्टेबल होती. अत्यंत प्रामाणिक...पण तिच्यावर लाच घेण्याचे आरोप केले गेले आणि तिने त्या भीतीपोटी आत्महत्या केली असं समोर उभं केलं गेलं. तारिणीच्या वडिलांनी तेव्हा मुलीच्या भविष्याचा विचार करत दुसरं लग्न केलं. 

तारिणीची सावत्र आई मात्र घरात येताक्षणी त्या हेड कॉन्स्टेबलचा उल्लेखही घरात करायचा नाही असं सगळ्यांना सांगितलंय. पण आपली आई चुकीच कधीच वागू शकत नाही हा विश्वास तारिणीला आहे, म्हणून आपल्या आईच सत्य आणि खऱ्या गुन्हेगाराला तिला जगापुढे आणायचं म्हणून ती पोलिसात भरती भरती झाली. तिच्या सोबत केदार नावाचा एक मुलगा आहे ज्याचा निशाणा कधीच चुकत नाही.. जशी तारिणी तिच्या आईच्या गुन्हेगाराचा शोध घेते आहे तसा केदार त्याला आणि त्याच्या आईला सोडून गेलेल्या वडिलांचा शोध घेत आहे... दोघे एकमेकांना आधार आहेत. केदारच्या मनात तारिणी विषयी प्रेमाची भावना आहे पण तो तिला आजवर सांगू शकला नाही.

अशाच वेळी मीडिया टायकून खांडेकरांच्या घरात तारिणी आणि केदार राहू लागतात. काय असं घडलं असेल की त्यांना खांडेकरांच्या घरात प्रवेश करावा लागतो. तारिणीने खांडेकरांच्या घरात शिरण्यामागचे काय असेल कारण? खांडेकरांच्या घरात तारिणीच्या आईच्या गुन्हेगाराचे धागेदोर सापडणार का?? ज्यामुळे तारिणी आणि केदार मध्ये दुरावा येईल? अशा प्रश्नासोबत मालिका सुरू राहते. या मालिकेचं कथा व पटकथा लेखन केलंय प्रल्हाद कुडतरकर यांनी, पूर्णानंद वांढेकर मालिकेचे संवाद लेखक आहेत. मालिकेच दिग्दर्शन करतायत भीमराव मोरे. तर मालिकेचे निर्माते आहेत एरिकॉन टेलिफिल्म्सचे शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई.  'तारिणी' ११ ऑगस्ट पासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता झी मराठीवर पाहायला मिळेल.