Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तारक मेहता'मधील नट्टू काकांनी व्यक्त केली अखेरची इच्छा, म्हणाले- 'शेवटच्या श्वासापर्यंत...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 14:04 IST

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील नट्टू काका म्हणजे घनश्याम नायक यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील नट्टू काका म्हणजे घनश्याम नायक कर्करोगाशी सामना करत आहे. ७७वर्षीय घनश्याम नायक यांच्या गळ्यावर काही स्पॉट्स दिसले. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांना दाखवले आणि त्यांना कर्करोग झाला असल्याचे निदान झाले.  घनश्याम नायक यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी किमोथेरपी सुरू केली आहे.नट्टू काका लवकर बरे व्हावेत, यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. दरम्यान आता नट्टू काकांनी आपली शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. नट्टू काकांना अगदी शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचे आहे.  एका कलाकाराने व्यक्त केलेली ही शेवटची इच्छा सगळ्यांचेच मन हेलावून टाकणारी आहे. 

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील नट्टू काका उर्फ घनश्याम नायक यांनी शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांना अगदी शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचे आहे. तसेच त्यांचा शेवटचा प्रवास हा चेहऱ्याला रंग लावूनच करायचा आहे. 

घनश्याम नायक यांच्या गळ्यावर तीन महिन्यांपूर्वी काही डाग दिसले. त्यानंतर त्यांनी उपचार करण्यास सुरूवात केली. नायक यांच्या मुलाने एप्रिल महिन्यात त्यांच्या गळ्याची पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी स्कॅनिंग केल्याची दिली. त्यांचे किमोथेरेपी सेशन्स देखील सुरू झाले आहेत. सध्या त्यांची तब्येत स्थिर आहे. प्रत्येक महिन्यात त्यांचे किमो सेशन होते. 

घनश्याम नायक बऱ्याच वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत काम करत आहेत. नट्टू काकांच्या भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माकर्करोग