तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत सुंदरलाल दिसणार आता या रूपात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2017 10:03 IST
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत सध्या रंगपंचमीची धूम सुरू आहे. रंगपंचमीला सगळ्यांनी किती वाजता जमायचे, काय काय ...
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत सुंदरलाल दिसणार आता या रूपात
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत सध्या रंगपंचमीची धूम सुरू आहे. रंगपंचमीला सगळ्यांनी किती वाजता जमायचे, काय काय करायचे याचे बेत सगळ्यांनी मिळून रंगपंचमीच्या आदल्या दिवशीच रचले आहेत. त्यानुसार सोसायटीमधील सगळे रंगपंचमी खेळण्यासाठी जमादेखील झाले आहेत. पण रंगपंचमी खेळायला सुरू करायच्या आधी पोपटलाल रंगपंचमी खेळायला आलेला नाही हे सगळ्यांच्या लक्षात आले आहे आणि त्यामुळे पोपटलाल जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत आपणही रंगपंचमी खेळायची नाही असे सगळ्यांनी ठरवले आहे. त्याला बोलावण्यासाठी अनेकजण जाऊनसुद्धा तो घरातून बाहेरच पडायला तयार नाहीये. यंदा रंगात खूप मिलावट झाली असल्याने आपण रंगपंचमी खेळायचीच नाही असे पोपटलालने ठरवले आहे. पण पोपटलालला रंगपंचमी खेळण्यासाठी सोसायटीच्या आवरात आणण्यासाठी गोकुळधामवासियांनी आता एक युक्ती योजली आहे आणि यात त्यांना सुंदरलाल मदत करणार आहे.सुंदरलाल मुलीची रंगभूषा करून पोपटलालच्या घरी जाणार आहे आणि त्यामुळे पोपटलालचा चांगलाच पोपट होणार आहे. जेठालाल, नट्टू काका आणि सुंदरलाल तिघे पोपटलालच्या घरी जाऊन सुंदरलाल म्हणजे सुंदरीसाठी पोपटलालचा हात मागणार आहेत. सुंदरचे हे साडी रूप पाहून पोपटलाल त्याच्या सुंदरतेवर घायाळ होऊन त्याच्यासोबत सोसायटीच्या आवारात येणार आहे आणि त्याला रंगपंचमी खेळायला लावण्याचा गोकुळधामवासियांचा प्लान यशस्वी ठरणार आहे. याविषयी या मालिकेत सुंदरलालची भूमिका साकारणारा मयुर वाकानी सांगतो, "माझे हे रूप पाहून पोपटलाल माझ्या प्रेमात पडणार आहे. मी माझ्या अदांनी पोपटलालला घायळ करणार आहे आणि यासाठी मला जेठालाला आणि नट्टू काका मदत करणार आहेत."