Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तारक मेहता'मधील बबिताच्या अफेयर्सच्या चर्चेदरम्यान मोबाईल वॉलपेपरवरील 'तो' फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 13:16 IST

मुनमुन दत्ताचा मोबाइल वॉलपेपरवरील फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनीदेखील प्रेक्षकांच्या मनात घप केले आहे. या मालिकेत बबिताजीची भूमिका अभिनेत्री मुनमुन दत्ता हिने साकारली आहे. तिला या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली आहे. तिचे खूप फॅन फॉलोव्हिंग असून ते तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वी मुनमुन वयाने ९ वर्षे लहान असणारा अभिनेता राज अनादकत याच्यासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या वृत्तांवर दोघे खूप संतापले होते. त्यानंतर आता तिचा मोबाइल वॉलपेपरवरील फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

अभिनेत्री मुनमुन दत्ताने नुकताच इंस्टाग्रामवर तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तिच्या फोनचा वॉलपेपरवर पाहायला मिळतो आहे. बबिताने वॉलपेपरवर कोणता फोटो ठेवला असेल याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. त्यात नवा ट्रेण्ड आल्याने बबिताने आपला वॉलपेपरचा तो व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

सोशल मीडियावर सध्या वॉलपेपर थीमचा व्हिडिओ तयार करण्याचा ट्रेण्ड पहायला मिळतो आहे. ज्यात मुनमुन दत्ताने ही सहभाग घेतला आहे. तिने आपला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. तिच्या या व्हिडिओला खूप लाईक्स मिळाले आहेत.
टॅग्स :मुनमुन दत्तातारक मेहता का उल्‍टा चश्‍मा