Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेने पूर्ण केले ३१०० एपिसोड, अजूनही रसिक आहेत एका गोष्टीच्या प्रतिक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 17:30 IST

मोजक्या मालिका वर्षानुवर्षे रसिकांच्या मनावर गारुड घालतात. अशीच एक मालिका म्हणजे  'तारक मेहता का उल्टा चश्मा'.  या मालिकेनं गेली अनेक वर्ष रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत एक नवा रेकॉर्ड रचला आहे.

छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतात. या मालिकांमधून घराघरात घडणा-या घडमोडी दाखवल्या जातात. त्यामुळे या मालिकांसोबत रसिकांचं वेगळं नातं निर्माण होतं. मालिकेत घडणा-या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरु आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे या मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात. मात्र छोट्या पडद्यावर वर्षानुवर्षे मालिकांची भाऊगर्दी झाली आहे. मालिकांमधून रसिकांचं मनोरंजन होतं, एकामागून एक भागातून घराघरात या मालिका लोकप्रिय ठरतात आणि ठराविक काळानंतर या मालिका रसिकांचा निरोप घेतात. 

मात्र या मालिकांपैकी अगदी मोजक्या मालिका वर्षानुवर्षे रसिकांच्या मनावर गारुड घालतात. अशीच एक मालिका म्हणजे  'तारक मेहता का उल्टा चश्मा'.  या मालिकेनं गेली अनेक वर्ष रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत एक नवा रेकॉर्ड रचला आहे. छोट्या पडद्यावर सर्वात जास्त काळ सुरु असणारी मालिका म्हणून  'तारक मेहता का उल्टा चश्मा'.  मालिकेनं नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. नुकतेच या मालिकेने ३२०० भागांचा टप्पा गाठला आहे. 

दया बेनच्या एक्झिटनंतरही मालिकेच्या टीआरपीवर कोणताही परिणाम झाला नाही. ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. पोपटलालच्या लग्नाची धामधूम पासून ते नवनवीन ट्विस्टने रसिकांना खिळवून ठेवले आहे.. त्यामुळे आगामी काळात  'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिका नवनवीन रेकॉर्ड रचणार असंच दिसत आहे.  मालिकेतील सगळीच पात्र रंजक आहेत. मात्र तरीही दया बेनला चाहते खूप मिस करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मुलीच्या जन्मानंतर दया बेन घरसंसारत रमली आणि म्हणून तिने मालिकेला गुड बाय केले होते. मात्र रसिकांच्या प्रेमापोटी निर्मात्यांनी वारंवार दिशा वाकानी म्हणजेच दया बेनला शोमध्ये परतण्यास सांगितले होते. मात्र मालिकेसाठी वेळ देणे जमणे अशक्यच होते. त्यामुळे आज नही तो कल म्हणत दया बेन पुन्हा दिसेल अशीच चाहत्यांना आशा आहे.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिशा वाकानी