Join us
Daily Top 2Weekly Top 5

तान्या मित्तल चढणार बोहल्यावर? चाहत्यांना दाखवला लग्नाचा लेहेंगा; शुभेच्छांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 10:35 IST

Tanya Mittal : सोशल मीडियावरील प्रसिद्ध चेहरा आणि ' बिग बॉस १९' मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेली स्पर्धक म्हणून तान्या ...

Tanya Mittal : सोशल मीडियावरील प्रसिद्ध चेहरा आणि 'बिग बॉस १९' मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेली स्पर्धक म्हणून तान्या मित्तल ओळखली जाते.  तान्या मित्तल सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तान्याने नुकत्याच शेअर केलेल्या काही व्हिडीओंमुळे ती लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तिने शेअर केलेले लेहेंग्याचे ट्रायल्स व्हिडीओ  पाहून चाहते आता तिचा होणारा पती कोण आहे, हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत.

तान्याने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. पहिल्या व्हिडीओमध्ये तान्या लाल रंगाचा अतिशय जड आणि सुंदर लग्नाचा लेहेंगा घालून ट्रायल रूममधून बाहेर येताना दिसत आहे. या पोस्टला तिने "आणि तयारी सुरू झाली आहे", असे सूचक कॅप्शन दिले आहे. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये तिने निळा लेहेंगा परिधान केला असून "त्याला हा लेहेंगा आवडेल का?" असं तिने म्हटलं.

तान्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आहे. एका युजरने कमेंट केली, "फेब्रुवारीत तान्या लग्न करणार अशा बातम्या रेडिटवर होत्या, त्या खऱ्या निघाल्या वाटतं". मात्र, काही चाहत्यांना शंका आहे की ही केवळ एखादी जाहिरात किंवा आगामी प्रोजेक्टची तयारी असू शकते. "तान्या इतक्या साध्या पद्धतीने लग्नाची घोषणा करणार नाही, नक्कीच काहीतरी मोठी धमाल असणार आहे" असेही काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

तान्याने अद्याप लग्नाच्या बातम्यांना अधिकृत दुजोरा दिलेला नाही किंवा आपल्या होणाऱ्या पतीचा चेहरा समोर आणलेला नाही. तिचे हे 'वेडिंग आउटफिट्स' पाहून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. आता सर्वांचे लक्ष तिच्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tanya Mittal to Wed? Bridal Lehenga Shown, Fans Shower Congratulations

Web Summary : Social media star Tanya Mittal sparked wedding rumors after sharing lehenga trial videos. Fans speculate about her future husband and congratulate her. Some suspect a promotional stunt.
टॅग्स :सेलिब्रिटीबिग बॉस १९