Join us
Daily Top 2Weekly Top 5

​तनुजा मुखर्जी यांना राग का आला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 15:10 IST

तनुजा सध्या आरंभ या मालिकेत काम करत आहेत. तनुजा मुखर्जी यांनी ज्वेलथीफ, दो चोर, मेरे जीवन साथी यांसारख्या अनेक ...

तनुजा सध्या आरंभ या मालिकेत काम करत आहेत. तनुजा मुखर्जी यांनी ज्वेलथीफ, दो चोर, मेरे जीवन साथी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या गेली अनेक वर्षं चित्रपटसृष्टीत कार्यरत असून त्यांनी एकापेक्षा एक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. आता त्या आरंभ या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहेत. या मालिकेद्वारे तनुजा मुखर्जी छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. त्या या मालिकेत हाहुमा या द्रविडांच्या सर्वोच्च धार्मिक गुरूची भूमिका साकारणार आहेत. या मालिकेची पत्रकार परिषेद नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेच्या वेळी तनुजा यांनी सगळ्या पत्रकारांशी मनसोक्त गप्पा मारल्या. तसेच अनेकांसोबत फोटोदेखील काढले. त्यावेळी एक पत्रकार फोटो काढल्यानंतर तनुजा यांच्यासोबत हात मिळवायला गेला. त्यावर हात मिळवणे ही आपली संस्कृती नसून हात जोडणे ही आपली संस्कृती असल्याचे तनुजा यांनी त्या पत्रकाराला सुनावले. पण त्यावर पत्रकार सुद्धा शांत झाला नाही. तो तनुजा यांना म्हणाला, तुम्ही सिगारेट ओढता, वाइन पिता असे मी ऐकले आहे. याचा अर्थ तुम्ही आधुनिक आहात असे मला वाटले होते. पण त्यावरदेखील तनुजा यांनी त्या पत्रकाराला चांगलेच ऐकवले. त्या म्हणाल्या, मी वाइन पिते, सिगारेट ओढते याचा अर्थ मी आधुनिक आहे असे होत नाही. आपल्या देशात ग्रामीण भागात राहाणाऱ्या अनेक स्त्रिया दारू पितात, सिगारेट ओढतात, याचा अर्थ त्या आधुनिक स्त्रिया आहेत असा होत नाही. तनुजा यांनी पत्रकाराला हे उत्तर देऊन त्याची बोलतीच बंद केली.