Join us
Daily Top 2Weekly Top 5

फुलांची उधळण, सुंदर उखाणा अन् तनुजची साथ! लग्नानंतर गोवलकरांच्या घरी 'असा' झाला अपूर्वाचा गृहप्रवेश, व्हिडीओ बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 10:10 IST

लग्नानंतर गोवलकरांच्या घरी अपूर्वाचं 'असं' झालं स्वागत, उखाण्याने जिंकली सासरच्या मंडळीची मनं, म्हणाली-"अंगणात आहे तुळस..."

Apurva Nemlekar: 'रात्रीस खेळ चाले'या मालिकेतून घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे अपूर्वा नेमळेकर. आपल्या सहज-सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. अपूर्वा व तनुज गोविलकर यांचा लग्नसोहळा गेल्या महिन्यात १४ तारखेला थाटामाटात पार पडला. अभिनेत्रीने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लग्नगाठ बांधत नव्या प्रवासाला सुरुवात केली. दरम्यान, अपूर्वा आणि तनुजच्या लग्नाचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.अशातच अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अपूर्वा नेमळेकरने लग्नानंतर तिचं सासरी कसं स्वागत करण्यात आलं याचा खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. गोवलकरांच्या घरात लाडक्या सुनेच्या गृहप्रवेशासाठी आकर्षक सजावट आणि फुलांची रांगोळी काढण्यात आली होती. परंपरेनुसार अपूर्वचा गोवळकरांच्या घरी गृहप्रवेश करण्यात आला. यावेळी अपूर्वाने सुंदर उखाणा देखील घेतल्याचं पाहायला मिळालं. गृहप्रवेशावेळी उखाणा घेताना अपूर्वा म्हणाली, "अंगणात आहे तुळस, तुळशीला लावला दिवा, तनुज रावांचा नाव घेते जन्मोजन्मी असाच जोडीदार हवा." दरम्यान,अभिनेत्रीचा हा व्हिडीओ पाहून  अनेकांनी या जोडीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

वर्कफ्रंट

अपुर्वा नेमळेकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर.'आभास हा',' आराधना',' रात्रीस खेळ चाले' आणि  ' प्रेमाची गोष्ट' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम करुन तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 'रात्रीस खेळ चाले' मालिकेत शेवंता नावाच्या पात्रामुळे ती आजही चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. बिग बॉसमध्ये उपविजेती ठरल्यानंतर ती स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत सावनी या भूमिकेत दिसली. त्यानंतर अलिकडेच  ती 'शुभविवाह' या मालिकेत पाहायला मिळाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Apurva Nemlekar's floral welcome, beautiful 'ukhana' at Govalkar's home!

Web Summary : Apurva Nemlekar, famed for 'Ratris Khel Chale,' married Tanuj Govilkar. Her home entry featured floral decorations and a traditional 'ukhana' (rhyming introduction). She mentioned her husband in the 'ukhana'. Apurva has starred in several popular series, including 'Premachi Goshta' and 'Shubh Vivah'.
टॅग्स :अपूर्वा नेमळेकरसेलिब्रिटीसोशल मीडिया