Join us
Daily Top 2Weekly Top 5

छोटे मियाँमध्ये झळकणार तमन्ना दिपक आणि तेहसीन शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2017 15:41 IST

छोटे मियाँ हा कार्यक्रम सुरू व्हायच्या आधीच या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा आहे. या कार्यक्रमात लहान मुले विविध परफॉर्मन्स सादर ...

छोटे मियाँ हा कार्यक्रम सुरू व्हायच्या आधीच या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा आहे. या कार्यक्रमात लहान मुले विविध परफॉर्मन्स सादर करणार आहेत. या कार्यक्रमाच्या याआधीच्या सिझनची विजेती ठरलेली सलोनी म्हणजेच गंगूबाई ही तर प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. या कार्यक्रमाने अनेक बालकलाकार छोट्या पडद्याला आणि बॉलिवूडला मिळवून दिले आहेत. हा कार्यक्रम लहान मुलांना त्यांची कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ मिळवून देतो. आता या कार्यक्रमाचा नवा सिझन लाँच होणार असून या कार्यक्रमात नेहा धुपिया आणि सोहेल खान परीक्षकाच्या भूमिकेत झळकणार आहेत. लहान मुलांना जज करण्यासाठी ते सध्या खूप उत्सुक आहेत. छोटे मियाँ या कार्यक्रमात चार ते चौदा या वयोगटातील मुलांना त्यांचे विनोद कौशल्य सादर करण्याची संधी दिली जाते. या कार्यक्रमासाठी ऑडिशन्स भारतातील विविध शहारातून घेण्यात आली होती. या कार्यक्रमात कोणाची निवड केली जावी आणि कोणाची नाही असे परीक्षकांना झाले होते. ऑडिशनमधून 12 बालकलाकारांची निवड केली गेली आहे. ते त्यांच्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झालेले आहेत. या बारा जणांमध्ये प्रेक्षकांना काही ओळखीचे चेहरेदेखील पाहायला मिळणार आहेत. शक्ती अस्तित्व के एहसास की आणि उडान या मालिकेत झळकलेली तेहसीन शाह या कार्यक्रमात भाग घेणार आहे. तेहसीनने उडान आणि शक्ती अस्तित्व के एहसास की या मालिकेत साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. त्याचसोबत इंडियाज बेस्ट ड्रामेबाजच्या दुसऱ्या सिझनमधील तमन्ना दिपकदेखील या कार्यक्रमाचा भाग असणार आहे. हे बारा जण प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत यात काही शंकाच नाही.