रितेश लुकवर घेतोय मेहनत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 17:18 IST
विकता का उत्तर या रिअॅलिटी शोद्वारे अभिनेता रितेश देशमुख छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. रितेश या मालिकेचे सूत्रसंचालन करणार ...
रितेश लुकवर घेतोय मेहनत
विकता का उत्तर या रिअॅलिटी शोद्वारे अभिनेता रितेश देशमुख छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. रितेश या मालिकेचे सूत्रसंचालन करणार आहे. मराठीतील आपली एंट्री दमदार व्हावी यासाठी सध्या रितेश चांगलाच मेहनत घेतोय. या कार्यक्रमातील त्याच्या लूककडेही तो स्वतः लक्ष देत आहे. या कार्यक्रमातील त्याच्या वेशभूषेसाठी वाहिनी अथवा प्रोडक्शन हाऊसच्या डिझायनरची मदत न घेता तो स्वतःच्या डिझायनरनेच बनवलेले कपडे घालणार असल्याचे कळतेय. या कार्यक्रमाबद्दल तो प्रचंड उत्सुक आहे. कारण या कार्यक्रमात केवळ स्पर्धकालाच नव्हे तर स्टुडिओत बसलेल्या प्रेक्षकांनाही पैसे जिंकण्याची संधी मिळणार असल्याचे कळतेय.