Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली तारक मेहता मालिकेतली ही कलाकार, लग्नाचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 14:28 IST

प्रियाने मालिकेचे दिग्दर्शक मावव राजदासोबत लग्न केले आहे. त्यांना एक मुलगाही आहे. विशेष म्हणजे प्रिया आणि मालव यांच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका गेल्या अनेक वर्षांपासून रसिकांचे मनोरंजन करत आहे. या शोच्या प्रत्येक कलाकाराला लोक भरभरुन पसंती देत असतात. त्यामुळे मालिकेतले कलाकार त्यांच्या खासगी आयुष्यात काय काय करतात हे जाणून घेण्याचीही चाहत्यांना प्रचंड रस असतो.दया बेन,जेठालाल, बबिताजी इतरांप्रमाणे या मालिकेतली रिटा रिपोर्टचाही मोठा चाहता वर्ग आहे. काही वर्षांपूर्वी प्रेग्नंसीमुळे तिने मालिकेतून ब्रेक घेतला होता. ती मालिकेत पुन्हा येत नाही तोपर्यंत चाहते तिची आतुरतेने वाट पाहात होते. प्रिया सतत मालिकेत झळकत नसली तरी अधून मधून मालिकेतून तिचे दर्शन घडत असते. या मालिकेत रिटा रिपोर्टर म्हणजेच प्रिया आहुजा सध्या चर्चेत आहे. प्रिया तिच्या करिअरमुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. प्रियाच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर नववधूप्रमाणे नटलेले लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो समोर येताच चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. 

प्रियाने मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदासोबत लग्न केले आहे. त्यांना एक मुलगाही आहे. विशेष म्हणजे प्रिया आणि मालव यांच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. याच खास क्षणाचे सेलिब्रेशन म्हणून त्यांनी पुन्हा एकदा लग्न करत त्यांच्या लग्नाचा १० वा वाढदिवस हटके पद्धतीने सेलिब्रेट केला. लग्नाचा १० व्या वाढदिवशी या दोघांनी त्यांच्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला. या सेलिब्रेशनमुळेच प्रिया आहुजा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. तारक मेहताच्या सेटवरच  मालव आणि प्रियाच्या नात्याची सुरुवात झाली. हळूहळू मैत्रीने प्रेमाचे रूप धारण केले आणि नंतर हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले.

मालिकेत आता प्रिया फार झळकत नसली तरी सोशल मीडियावर ती सक्रिय असते. संपूर्ण वेळ सध्या ती तिच्या बाळासह एन्जॉय करते. बाळासोबतचे अनेक फोटो व्हिडीओ शेअर करताना ती दिसते. इतकंच काय तर तिचेही विविध अंदाजातील फोटो ती चाहत्यांसह शेअर करत असते. तिचा प्रत्येक अंदाज पाहून चाहतेही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा