Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG! तारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीचा नंबर झाला व्हायरल, मग तिने केले असे काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 08:00 IST

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील दया म्हणजेच दिशा वाकानीचा नंबर व्हायरल झाल्यामुळे तिला अनोळखी लोकांचे फोन सतत यायचे.

ठळक मुद्देदिशा हे सगळे फोन उचलायची आणि लोकांशी वेगवेगळे आवाज काढून बोलायची. कधीकधी तर ती पुरुषाच्या आवाजात देखील बोलायची. ती लोकांना सांगायची की, मॅडम सध्या शुटिंगमध्ये बिझी आहेत.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा आता प्रेक्षकांना त्यांच्यातील एक वाटू लागल्या आहेत. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, पोपटलाल, अब्दुल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दया म्हणजेच दिशा वाकानी मालिकेत कधी परतणार याची वाट प्रेक्षक गेल्या काही महिन्यांपासून पाहात आहेत. दिशा गेल्या वर्षभरापासून या मालिकेत नसली तरी दिशाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाहीये. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील सगळ्याच कलाकारांमध्ये खूपच छान नाते आहे. या मालिकेत माधवी भिडेच्या भूमिकेत असलेल्या सोनालिका जोशीने, कोमलच्या भूमिकेत असलेल्या अंबिका रंजनकरने आणि सोढीच्या भूमिकेत असलेल्या जेनिफर मिस्त्रीने ई टाईम्सला काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत या मालिकेतील अनेक कलाकारांच्या सिक्रेटविषयी सांगितले होते.

जेनिफरने या मुलाखतीत सांगितले होते की, एकदा दिशाचा फोन नंबर व्हायरल झाला होता आणि त्यामुळे तिला दिवसांत ५० हून अधिक अनोळखी लोकांचे फोन यायचे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण दिशा हे सगळे फोन उचलायची आणि लोकांशी वेगवेगळे आवाज काढून बोलायची. कधीकधी तर ती पुरुषाच्या आवाजात देखील बोलायची. ती लोकांना सांगायची की, मॅडम सध्या शुटिंगमध्ये बिझी आहेत. तिने ते सगळे प्रकरण अतिशय शांतपणे हाताळले होते. या सगळ्यात तिला चिडताना आम्ही कधीच पाहिले नव्हते.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिशा वाकानी