Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतून ही कलाकार घेणार निरोप, BMW सारख्या गाडींची आहे मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 12:43 IST

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून ही कलाकार बाहेर पडणार असल्याचे समजते आहे.

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका 2008 सालापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. तसेच या मालिकेती प्रत्येक पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत तारक मेहताची पत्नी अंजली भाभीची भूमिका नेहा मेहता करत आहे. फार कमी लोकांना माहित आहे की नेहा मेहता खूप चांगली डान्सर आहे आणि भरतनाट्यममध्ये माहिर आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नेहा मेहता या मालिकेला रामराम करणार आहे.

स्पॉटबॉय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेहा मेहताने निर्मात्यांना आपला निर्णय आधीच सांगितला आहे. आता ती सेटवर रिपोर्ट करत नाही. असेही सांगितले जात आहे की, अंजली भाभी तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेच्या आगामी भागात दिसणार नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार तारक मेहताची पत्नी अंजली भाभीची भूमिका करणारी नेहा या मालिकेसाठी एक दिवसाचे जवळपास पंचवीस हजार मानधन घेते. त्यासोबतच ती पंधरा दिवस शूटिंग करते.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार नेहा ऑडी, बीएमडब्ल्यू सारख्या गाडींची मालकीण आहे.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा