Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! तारक मेहतामध्ये भिडेंचा अय्यरच्या भूमिकेवर 'डोळा', बबीताजी तर नाही ना कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 15:36 IST

तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत आत्माराम भिडेची भूमिका करणारे मंदार चंदवाडकर यांचं म्हणणं आहे की, जर मालिकेत त्यांना दुसरी भूमिका करायला मिळाली तर त्यांना अय्यरची भूमिका साकारणं जास्त आवडेल.

लॉकडाऊननंतर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेने धमाकेदार कमबॅक केलं आहे. शो टीआरपी चार्टमध्ये सतत वरच्या क्रमांकावर आहे. आधीप्रमाणेच मालिकेतील एकापेक्षा एक भारी भूमिकाही आपला जलवा दाखवत आहेत. अशात या मालिकेत आत्माराम भिडेची भूमिका करणारे मंदार चंदवाडकर यांचं म्हणणं आहे की, जर मालिकेत त्यांना दुसरी भूमिका करायला मिळाली तर त्यांना अय्यरची भूमिका साकारणं जास्त आवडेल.

एका मुलाखतीत भिडे म्हणजे मंदार यांनी सांगितले की, ते नेहमीच अय्यरच्या भूमिकेबाबत विचार करत असतात. पण याचं कारण बबीता जी नाहीये. मला माहीत आहे बरेचजण असाच विचार करतील. पण मला नवीन भाषा शिकण्याची जास्त आवड आहे आणि जर मला ती भूमिका मला मिळाली तर ती करायला मला नक्कीच आवडेल. मी जेव्हा दुबईमध्ये होतो तेव्हा मी थोडी फार मल्याळम शिकलो होतो. जर मला संधी मिळाली तर मी तमिळ भाषा शिकणार आणि मिस्टर अय्यरची भूमिका साकारणार.

मंदार म्हणाले की, अय्यरची भूमिका फारच वेगळी आहे. या भूमिकेला अनेक सारे शेड्स आहे. जेठालालसोबत त्यांचं जे प्रेम आणि भांडणं होतं ते वेगळं आणि भिडेसोबत भांडण होतं ते वेगळं असतं. हे सगळं बघता मला जर संधी मिळाली तर मी नक्कीच ही भूमिका साकारण्याची माझी इच्छा असेल.

टीव्हीच्या विश्वात 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका सुरू होऊन १२ वर्षे झाली आहेत. नुकतेच टीमने १२ वर्षे साजरे केले. लॉकडाऊननंतर आता व्यवस्थित शूटींग सुरू झालं असून नवीन एपिसोड २ जुलैपासून सुरू झाले आहेत.

हे पण वाचा :

VIDEO: लोकांना फक्त बबीताजींची काळजी, माझी नाही; मुलाखतीत इमोशनल झाले अय्यर...

जेठालाल ऊर्फ दिलीप जोशीने शेअर केला ३७ वर्ष जुना फोटो, ओळखणंही झालं कठिण!

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील नट्टू काकांची ही अंतिम इच्छा ऐकून व्हाल भावूक ...! 

 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटेलिव्हिजन