Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रेग्नेंट आहे 'तारक मेहतामधील ही अभिनेत्री...' बेबी बंप फ्लॉन्ट करत शेअर केली गुड न्युज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 15:03 IST

या मालिकेतील जेठालाल, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोढी, अय्यर, बबिता, कोमल, मिस्टर हाथी, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही प्रेक्षकांची चांगलीच आवडती  मालिका  आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील जेठालाल, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोढी, अय्यर, बबिता, कोमल, मिस्टर हाथी, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. अगदी त्याच प्रमाणे मालिकेतील रीटा रिपोर्टर तुम्हाला आठवत असेल....रिटा रिपोर्टर भूमिका अभिनेत्री प्रिया आहूजा राजदाने साकारली होती.  या मालिकेत रिटा प्रेक्षकांना खूपच कमी भागांत पाहायला मिळत असली तरी प्रेक्षकांची ती प्रचंड लाडकी आहे. आता प्रिया  प्रेग्नेंट असल्याची गुड न्युज तिने चाहत्यांसह शेअर केली आहे. 

प्रियाने  नवंबर 2018 मध्ये दिग्दर्शक मालव राजदासह लग्न केले. त्या दोघांची ओळख याच मालिकेच्या सेटवर झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. दोघेही सध्या खूप खुश असून बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. सध्या दोघेही मावदीव्हजमध्ये बेबीमुन सेलिब्रेट करत आहेत.

 

शेअर केलेल्या फोटोमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. विशेष म्हणजे प्रियाने जन्माष्टमीच्या खास मुहुर्तावर ती प्रेग्नंट असल्याची खुश खबर पहिल्यांदा सोशल मीडियावर शेअर केली होती.

प्रियाला आपण ऑन्सक्रीन फक्त जीन्स आणि शर्ट, कुर्ता अशाच पेहरावात पाहिले आहे. मात्र रिअल लाईफमध्ये ती खूप स्टायलिश असून तिचा ग्लॅमरस अंदाज पाहून तुम्हीही तिच्यावर फिदा झाल्याशिवाय राहणार नाही.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा