Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तारक मेहता' फेम दयाबेनला कॅन्सर? चर्चांमुळे चाहते हैराण! याबाबत 'जेठालाल' म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 13:18 IST

Disha Vakani : दिशा वकानीला घशाचा कॅन्सर झाल्यामुळे ती मालिकेत परत येऊ शकत नसल्याचे म्हटले जात आहे. या चर्चेमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta Ka Ulta Chashma) गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी मेहता साहबची भूमिका निभावणारा अभिनेता शैलेश लोढा यांनी मालिकेला रामराम केला. त्यानंतर मिसेस रोशन सोढीची भूमिका साकारणारी जेनिफर मिस्त्रीने निर्माते असितकुमार मोदी आणि प्रॉडक्शन टीममधील काही लोकांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला. आता या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी(Disha Vakani)बद्दल नवीन चर्चा सुरू झाली आहे. दिशाला घशाचा कॅन्सर झाल्यामुळे ती मालिकेत परत येऊ शकत नसल्याचे म्हटले जात आहे. या चर्चेमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

दिशा वकानी हिने बाळंतपणाच्या सुट्टीसाठी मालिकेतून काही काळ ब्रेक घेतला होता. मूल झाल्यानंतर ती दयाबेनच्या भूमिकेसाठी परतणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता बऱ्याच वर्षांनंतरही दिशा मालिकेत परतलेली नाही. दयाबेनच्या भूमिकेत दिशा पुन्हा कधी येणार, असा प्रश्न निर्मात्यांना वारंवार विचारला जातो आहे. मात्र त्यावर ठोस असे उत्तर त्यांनी कधीच दिले नाही. नुकतेच सोशल मीडियावर दिशाच्या कॅन्सरची चर्चा होताना दिसत आहे. तिला घशाचा कॅन्सर झाल्याचे वाचून चाहते हैराण झाले आहेत. या चर्चांवर आता जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दिशाच चाहत्यांना याबद्दल सांगेल...

दिलीप जोशी म्हणाले की, मला सकाळपासून सतत फोन येत आहेत. मात्र यावर अद्याप दिशा वकानीने काही उत्तर दिले नाही. जेव्हा तिच्यापर्यंत या चर्चा पोहोचतील, तेव्हा ती स्वत: चाहत्यांना खरे काय ते सांगेल, अशी मला खात्री आहे. तसेच निर्माते असितकुमार मोदींनीसुद्धा याविषयी काहीच माहित नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे दिशा या चर्चांवर काय उत्तर देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिशा वाकानी