Join us

सुजलेला चेहरा, डोळ्याखाली काळी वर्तुळं...उर्फी जावेदची अवस्था पाहून हैराण झाले चाहते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 13:24 IST

Urfi Javed: उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्यामुळे ती नेहमीच व्हिडीओ आणि फोटोंमुळे चर्चेत असते.

आज २०२२ चा शेवटचा दिवस आहे. मात्र वर्ष संपल्यानंतरही फॅशन क्वीन उर्फी जावेद(Urfi Javed)चा त्रास संपलेला नसल्याचे दिसून येत आहे. उर्फी जावेदने सोशल मीडियावर एक नवीन समस्या शेअर केली आहे. पोस्टच्या माध्यमातून उर्फी जावेद अंडर आय क्रीम बनवणाऱ्या कंपन्यांचा पर्दाफाश करताना दिसत आहे.

उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्यामुळे ती नेहमीच व्हिडीओ आणि फोटोंमुळे चर्चेत असते. उर्फी अनेकदा तिच्या समस्या इंस्टाग्रामवर शेअर करताना दिसत आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवशी उर्फीने अंडर आय क्रीम बनवणाऱ्या कंपन्यांचा पर्दाफाश केला आहे. तिने एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोत उर्फीच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसत आहेत. फोटो शेअर करताना ती लिहिते की, 'म्हणून काल मी मेकअप करून लपवला. मला स्वतःचा अभिमान आहे. नाही, मला कोणी मारले नाही. मी आय फिलर्स केले आहेत, त्यामुळे थोडी जळजळ होतेय.

यानंतर उर्फी जावेदने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते की, 'मी अंडर आय फिलर्स करून घेतले आहे. माझ्या डोळ्याखाली खूप घाणेरडी काळी वर्तुळे आली होती. अंडर आय क्रीम एक घोटाळा आहे. अशी कोणतीही क्रीम नाही जी तुमची काळी वर्तुळे हलकी करू शकते. यासाठी फिलर्स करणे हा उत्तम पर्याय आहे.

वर्कफ्रंट...उर्फी जावेद टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.  उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र ८ व्या दिवशीच ती घरातून बाहेर पडली होती. या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली. 

टॅग्स :उर्फी जावेद