पावसाच्या पाण्याने भरला स्विमिंग पूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 15:51 IST
इश्कबाज या मालिकेत आपल्याला ऑबेरॉय कुटुंब पाहायला मिळत आहे. हे ऑबेरॉय कुटुंब अतिशय श्रीमंत असल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे. ...
पावसाच्या पाण्याने भरला स्विमिंग पूल
इश्कबाज या मालिकेत आपल्याला ऑबेरॉय कुटुंब पाहायला मिळत आहे. हे ऑबेरॉय कुटुंब अतिशय श्रीमंत असल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे. या कुटुंबाचा मोठा बंगला असून या बंगल्यात सगळ्याच आधुनिक सुखसोयी आहेत. या बंगल्यात असलेला स्विमिंग पूलही या मालिकेच्या अनेक दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. स्विमिंग पूलसाठी खूपच जास्त पाणी लागते. महाराष्ट्रात गेल्यावर्षी आलेला दुष्काळ पाहाता स्विमिंग पूलसाठी पाणी वाया घालवणे या मालिकेच्या निर्मात्यांना पटत नव्हते. त्यामुळे त्यांनी या स्विमिंग पूलाचे पाणी टँकरने अथवा पिण्याच्या पाण्याने न भरता पावसाच्या पाण्याने भरले आहे. यामुळे पाण्याची बचत होण्यास मदत होते असे या टिमचे म्हणणे आहे.