Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणवीर सिंगपासून सारा अली खानने लपवलंय 'हे' सीक्रेट, स्वत: केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 06:00 IST

रिअ‍ॅलिटी शोच्या मंचावर साराने या गोष्टीचा खुलासा केला.

कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्या बहुचर्चित 'लव्ह आज कल' सिनेमा येत्या फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाइन डेला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कार्तिक आणि सारा वेगवेगळ्या रिअ‍ॅलिटी शोच्या मंचावर येतायेत.  

नुकतेच सारा आणि कार्तिक ‘झी टीव्ही’वरील म्युिझक काऊं टडाऊन’ या शोमध्ये आले होते. यावेळी साराने एक किस्सा सांगितला. सारा अलीने आपल्या सोशल मीडियावरील एका अकाऊंटमध्ये लव्ह आजकलचे शूटिंग अविसंस्मरणीय केल्याबद्दल कार्तिक आर्यन आणि इम्तियाझ अली यांचे आभार मानले होते. त्याचा उल्लेख करून रणवीर सिंहने तिला विचारले की कार्तिक आर्यनशी तिची ओळख कोणी करून दिली. “कार्तिक आणि मी रणवीर सिंहच्या माध्यमातून पहिल्यांदा भेटलो नव्हतो. आमची भेट त्यापूर्वीच झाली होती. पण रणवीर सिंह इतका गोड आहे की त्याला आनंदी ठेवण्यासाठी आम्ही ही थाप नेहमी मारत राहू,” असे सारा हसत हसत म्हणाली. 

'लव्ह आज कल'मध्ये सारा, कार्तिकशिवाय रणदीप हुड्डा, आरुषी शर्मादेखील मुख्य भूमिकेत आहेत. २००९ मध्ये आलेल्या सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणच्या 'लव्ह आज कल' चित्रपटाचा हा दुसरा सीक्वल आहे.

टॅग्स :सारा अली खानकार्तिक आर्यन