Join us

गोड शेवट होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 15:22 IST

मेरी आवाजही पहचान है ही मालिका काहीच दिवसांत संपणार आहे. या मालिकेचा शेवटही इतर मालिकांप्रमाणे गोडच होणार असल्याचे म्हटले ...

मेरी आवाजही पहचान है ही मालिका काहीच दिवसांत संपणार आहे. या मालिकेचा शेवटही इतर मालिकांप्रमाणे गोडच होणार असल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेत दोन बहिणींमध्ये असलेले वैमनस्य आपल्याला पाहायला मिळाले होते. पण कार्यक्रमाच्या शेवटी या दोघांमधील असलेली सगळी भांडणे मिटणार असल्याचे म्हटले जात आहे. कल्याणी आणि केतकी शाळेत गाण्यासाठी जाणार आहेत. दोघी समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यातील इतक्या वर्षांचा दुरावा दूर होणार आहे. आपापसातील सगळे वाद-विवाद विसरून त्या एकत्र येणार आहेत अशी चर्चा आहे.