Join us

स्वानंदीच्या आईने लाडक्या जावयाचा असा केलेला गृहप्रवेश; आशिषने सांगितला खास किस्सा, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 18:22 IST

टिकेकरांच्या घरात लाडक्या जावयाचा झालेला गृहप्रवेश! स्वानंदी-आशिषच्या लग्नाचा किस्सा आहे खास

Aashish Kulkarni: ' दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी हे कलाविश्वातील चर्चेत असणारं कपल आहे. अभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती टिकेकर यांची एकुलती एक लेक स्वानंदी आणि आशिष कुलकर्णीचा २५ डिसेंबर २०२३ रोजी पुण्यात थाटामाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 'इंडियन आयडॉल १२' गाजवणारा गायक आशिष कुलकर्णी हा देखील उत्तम गायक आहे. सध्या हे कपल चर्चेत आलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या लग्नाचे किस्से शेअर केले आहेत.

स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णीने नुकतीच ऋजुता देशमुख यांच्या अनुरुप विवाह संस्थाला मुलाखत दिली. त्यादरम्यान, आशिषने खास किस्सा सांगितला. तेव्हा तो म्हणाला, हा खूप भारी किस्सा काकू मला म्हणाल्या की, स्वानंदीचा गृहप्रवेश तुम्ही करालच पण तुझंही गृहप्रवेश आमच्या घरी करायचंय. स्वानंदी आमची एकुलती एक मुलगी आहे. आम्हाला मुलगी कोणाकडे दिलीय यापेक्षासुद्धा आमच्याघरी एक मुलगा आला असं म्हणून तुमचा गृहप्रवेश करायचा आहे. तुझं स्वागत आम्ही आमच्या घरी करणार. त्यानंतर त्यांनी मला ओवाळलं आणि मला पहिल्यांदा गायला लावलं."असा सुंदर किस्सा आशिषने चाहत्यांना सांगितला.

आशिष कुलकर्णी हा गायक असून देशविदेशात तो त्याच्या गाण्याचे कार्यक्रम करतो. आशिष उत्तम गायक आहेच पण स्वानंदीलाही आईकडून गाण्याचा वारसा मिळालाय. 'आमचं ठरलंय' असं सांगत स्वानंदीने २० जुलैला सोशल मीडियावर स्वानंदी आणि आशिषने प्रेक्षकांना सुखद धक्का दिला होता.

टॅग्स :स्वानंदी टिकेकरटिव्ही कलाकार