Join us
Daily Top 2Weekly Top 5

बापमाणूस नंतर आता सुयश टिळक दिसणार या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 16:31 IST

सुयश बापमाणूस या मालिकेनंतर कोणत्या मालिकेत झळकणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागली आहे. सुयशच्या फॅन्ससाठी एक खूपच चांगली बातमी आहे. सुयश आता लवकरच एका मालिकेत झळकणार असून या मालिकेतील त्याची भूमिका ही आजवरच्या त्याच्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी आहे.

ठळक मुद्देस्टार प्रवाहच्या छोटी मालकीण या मालिकेत सुयश टिळक धमाकेदार एण्ट्री करणार आहे. आजवर त्याचे न पाहिलेलं रूप या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘छोटी मालकीण’ या मालिकेत सुयश टिळक सुरेश ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. आजवर सुयशला आपण चॉकलेट हिरोच्या भूमिकांमध्ये पाहिलं आहे. पण ‘छोटी मालकीण’ मधील भूमिका सुयशच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी आणि हटके असणार आहे.

का रे दुरावा या मालिकेतील अभिनेता सुयश टिळक याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ही मालिका संपून अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेत त्याने साकारलेली यश ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. तो नुकताच बापमाणूस या मालिकेत झळकला होता. या मालिकेतील त्याच्या भूमिकेचे देखील चांगलेच कौतुक झाले होते. सुयशच्या या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता या मालिकेनंतर सुयश कोणत्या मालिकेत झळकणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागली आहे. सुयशच्या फॅन्ससाठी एक खूपच चांगली बातमी आहे. सुयश आता लवकरच एका मालिकेत झळकणार असून या मालिकेतील त्याची भूमिका ही आजवरच्या त्याच्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. या मालिकेसाठी त्याने चित्रीकरण करायला सुरुवात केली असून या मालिकेत त्याची लवकरच एंट्री होणार आहे. 

स्टार प्रवाहच्या छोटी मालकीण या मालिकेत सुयश टिळक धमाकेदार एण्ट्री करणार आहे. आजवर त्याचे न पाहिलेलं रूप या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘छोटी मालकीण’ या मालिकेत सुयश टिळक सुरेश ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. आजवर सुयशला आपण चॉकलेट हिरोच्या भूमिकांमध्ये पाहिलं आहे. पण ‘छोटी मालकीण’ मधील भूमिका सुयशच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी आणि हटके असणार आहे. याआधी स्टार प्रवाहच्या पुढचं पाऊल, दुर्वा, बंध रेशमाचे आणि देवयानी या मालिकांमध्ये सुयश झळकला होता. त्यामुळे पुन्हा एकदा याच वाहिनीवरील छोटी मालकीण मालिकेत काम करण्यास तो खूपच एक्सायटेड आहे. 

‘स्टार प्रवाहच्या कुटुंबात पुन्हा एकदा सामील होत असल्याचा आनंद तर आहेच. शिवाय नव्या वर्षात नवं काहीतरी करायला मिळतंय हे जास्त सुखावणारं आहे. प्रेक्षकांनी आजवर माझ्या सर्वच मालिकांवर भरभरून प्रेम केलं आहे. त्यामुळे छोटी मालकीण मधील माझी भूमिका आणि माझ्या एंट्रीनंतर मालिकेत येणारं नवं वळण प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.’ अशी भावना सुयश टिळकने व्यक्त केली.

टॅग्स :सुयश टिळक