Join us

Surbhi Tiwari : "माझा खूप छळ केला अन्..."; 'दीया और बाती हम' फेम सुरभी तिवारीने पतीवर केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 19:13 IST

Surbhi Tiwari : दोन वर्षांपूर्वी सुरभीने पायलट असलेल्या प्रवीण कुमार सिन्हासोबत लग्न केलं होतं. पण आता त्यांचा संसार मोडण्याच्या मार्गावर आहे. तिने पतीवर घरगुती हिंसाचार आणि धमकावण्याचा आरोप केला आहे.

नवी दिल्ली - 'दीया और बाती हम' फेम सुरभी तिवारीने (Surbhi Tiwari) पतीवर गंभीर आरोप केल्याची घटना आता समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी सुरभीने पायलट असलेल्या प्रवीण कुमार सिन्हासोबत लग्न केलं होतं. पण आता त्यांचा संसार मोडण्याच्या मार्गावर आहे. तिने पतीवर घरगुती हिंसाचार आणि धमकावण्याचा आरोप केला आहे. एका मुलाखतीत तिने हा धक्कादायक खुलासा केला आहे. लग्नानंतर पतीचा खरा चेहरा समोर आला. त्यांच्यात अनेक गोष्टींवरून वाद होऊ लागले. फक्त पतीच नाही तर सासरची मंडळी देखील छळ करत असल्याचं म्हटलं आहे. 

"लग्नानंतर काही दिवसांतच मला समजलं की प्रवीण आणि मी एकमेकांसाठी कम्पेटिबल नाही. त्याने माझ्यासोबत मुंबईला येण्यासाठी आधी हा म्हटलं होतं. पण नंतर येण्यास नकार दिला. लग्नानंतर प्रवीण आणि त्याच्या कुटुंबियांनी प्रचंड मानसिक त्रास दिला आहे. लग्नापूर्वी मी त्यांना मी सिनेसृष्टीतील करिअर सोडणार नसल्याचं सांगितलं होतं. परंतु लग्नानंतर मात्र त्यांनी मला करिअर सोडण्यासाठी दबाव टाकला. आर्थिकदृष्ट्या मी पूर्णपणे प्रवीणवर अवलंबून होते. माझ्या खाण्यावर बंधनं आणली. पैशाचा हिशोब माझ्याकडे मागितला जायचा" असं सुरभीने सांगितलं.

सुरभीने माहेरकडून लग्नात दिलेले सोन्याचे दागिने तसेच चांदीची भांडी देखील प्रवीणच्या कुटुंबियांनी परत दिले नसल्याचं म्हटलं आहे. माझ्यावर स्वत:'च्या औषधोपचारासाठी माझं सोनं विकण्याची वेळ आहे. लग्नानंतर मला मुल हवं होतं. सुखी कुटुंब हवं होतं, परंतु प्रवीण तयार झाला नाही, असंही सुरभीने म्हटलं आहे. सुरभी तिवारीने कहानी घर घर की, शगुन आणि अगले जनम मुझे बिटिया ही कीजो साऱख्या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनगुन्हेगारी