Join us  

​‘तू सूरज, मैं साँझ पियाजी’मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार अविनाश रेखीचे नवे रूप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 8:21 AM

‘स्टार प्लस’वरील ‘तू सूरज, मैं साँझ पियाजी’ ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मन जिंकत आहे. या मालिकेचे नुकतेच चित्रीकरण बँकॉकमध्ये ...

‘स्टार प्लस’वरील ‘तू सूरज, मैं साँझ पियाजी’ ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मन जिंकत आहे. या मालिकेचे नुकतेच चित्रीकरण बँकॉकमध्ये करण्यात आले. बँकॉकमध्ये मालिकेचे चित्रीकरण करण्याचा या मालिकेच्या टीमचा अनुभव खूपच चांगला होता. या मालिकेत अभिनेता अविनाश रेखी प्रेक्षकांना उमाशंकर या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तसेच रिया शर्मा कनकची तर सादिया सिद्दिकी मासी सा ही भूमिका साकारत आहे. मासी साचे पितळ उघडे पाडून उमाशंकरचे निरपराधित्त्व सिद्ध करण्याच्या मोहिमेवर कनक, उमाशंकर बँकॉकला आले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तू सूरज, मैं साँझ पियाजी या मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना खूपच वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. आगामी भागांमध्ये उमाशंकर मासी साच्या समलिंगी व्यवस्थापकाला आपल्याकडे आकर्षून घेणार आहे आणि त्याचमुळे कनकला तिचे खरे स्वरूप कळणार आहे. या प्रसंगासाठी अविनेशने नुकतेच चित्रीकरण केले. या दृश्यात अविनेश केवळ अंतर्वस्त्रामध्ये दिसणार असून आपल्या उघड्या पिळदार शरीराचे प्रदर्शन करणार आहे. या प्रसंगाच्या चित्रीकरणाविषयी अविनाशने सांगितले, “या दृश्यात माझे अ‍ॅब्स चांगले दिसावेत, म्हणून मी विशेष परिश्रम घेतले आहे. या प्रसंगात मी ‘दोस्ताना’ चित्रपटातील जॉन अब्राहमच्या एका प्रसंगाची नक्कल करावी, असे मला सांगण्यात आले होते. त्या प्रसंगात जॉनने आपल्या पिळदार शरीराचे प्रदर्शन केले होते. जॉन अब्राहमसारख्या पिळदार शरीराच्या अभिनेत्याची नक्कल करावी लागणार असल्यामुळे मी मनातून तसा घाबरलो होतो; पण छोट्या पडद्यावर जॉन अब्राहम बनण्याची संधी मला मिळणार असल्याचा आनंदही मला झाला होता.”अविनाश या दृश्यासाठी चित्रीकरण करत असताना बघ्यांची चांगलीच गर्दी जमली होती. प्रेक्षकांना अविनाश रेखीचे आजवर कधीच न दिसलेले रूप तू सूरज, मैं साँझ पियाजी या मालिकेत पाहायला मिळणार आहे. कपाळावर टिळा आणि धोतर या पूर्ण पारंपरिक भारतीय वेशात अविनाशला या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळते. आता त्याचा हा नवा लूक देखील प्रेक्षकांना आवडेल अशी अविनाश आणि मालिकेच्या टीमला खात्री आहे. Also Read : निर्मात्यांनी या अटी मान्य केल्यानंतरच बोल्ड सीन्स देण्यास तयार झाली ही टीव्ही अभिनेत्री?जाणून घ्या काय होत्या खास अटी