Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बोलत नाही म्हणून गरीबांचा फायदा घेतात..'; अन्यायाविरुद्ध सूरज पेटून उठणार, निक्कीला नडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 13:25 IST

सूरज चव्हाणचा नवीन प्रोमो व्हायरल झालाय. या प्रोमोत तो बिग बॉसच्या घरात निर्धार करताना दिसतो (bigg boss marathi 5)

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमोत सूरज चव्हाण हा अभिजीत चव्हाण आणि आर्या जाधवसोबत बोलताना दिसतोय. यावेळी सूरजचं बोलणं ऐकून आर्या आणि अभिजीत दोघेही थक्क झाले. सूरजने घरात एक निर्धार केलाय. सूरज चव्हाणने घरातील निक्की तांबोळीचा विषय सर्वांसमोर काढलाय. निक्की तांबोळीच्या अन्यायाविरुद्ध सूरज वाचा फोडताना दिसणार आहे.

सूरज चव्हाण मनातलं थेट बोलला

'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सूरज चव्हाण अभिजीत सावंत आणि आर्या जाधवला म्हणत आहे,"जिथे अत्याचार होणार तिथे सूरज चव्हाण उभा राहणार... बोलत नाहीना म्हणून ते असा गरीबांचा फायदा घेतात. निक्कीने केलं की आपण ते सहन करायचं? आणि तेच आर्याने केलं तर? आपल्या ग्रुपमधलं कोणीही असो त्याला पाठिंबा द्यायचा म्हणजे द्यायचा..तू नड".

सूरजला कळतोय घरातला खेळ

'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू होऊन २५ दिवस पूर्ण झाले आहेत. सीझन सुरू झाल्यापासूनचा प्रत्येक दिवस हा खूप खास आहे. प्रत्येक सदस्याने आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. गोलीगत सूरज चव्हाण सुरुवातीला खूप शांत होता. पण आता हळूहळू त्याला 'बिग बॉस मराठी'चा खेळ कळू लागला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात जिथे चुकीचं होणार तिथे सूरज चव्हाण उभा राहणार आहे, असा त्याने निर्धार केलेला दिसतोय. 

 

टॅग्स :बिग बॉस मराठीटेलिव्हिजनकलर्स मराठी