Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुपर सिस्टर फेम गौरव वाधवा अशाप्रकारे घेतो फिटनेसवर मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 18:05 IST

सोनी सब वाहिनीवरील सुपर सिस्टर मालिकेत देखण्या अश्मित ओबेरॉयची भूमिका गौरव वाधवा साकारत आहे. गौरवचा विशिष्ट अशा ‘फिटनेस मंत्रा’वर विश्वास नाही पण तो त्याच्या व्यग्र दिनक्रमातून वेळ काढून किमान एक तास वर्क आऊट नक्कीच करतो. 

कोणताही अभिनेता हा त्याच्या अभिनयासाठी आणि दिसण्यासाठी ओळखला जातो. त्यात तो फिट असेल, तर त्याचे पडद्यावरील रूप अधिक उठून दिसते. चांगल्या स्क्रीन प्रेझेन्ससाठी आपल्या शारीरिक तंदुरुस्तीवर भर देणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सोनी सब वाहिनीवरील सुपर सिस्टर्स या मालिकेतील गौरव वाधवाही सामील आहे. गौरव वाधवाने थपकी प्यार की, ये रिश्ता क्या कहलाता है, ये है मोहोब्बते यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.  

सोनी सब वाहिनीवरील सुपर सिस्टर मालिकेत देखण्या अश्मित ओबेरॉयची भूमिका गौरव वाधवा साकारत आहे. गौरवचा विशिष्ट अशा ‘फिटनेस मंत्रा’वर विश्वास नाही पण तो त्याच्या व्यग्र दिनक्रमातून वेळ काढून किमान एक तास वर्क आऊट नक्कीच करतो. 

सुपर सिस्टर या मालिकेत अश्मित ओबेरॉयच्या भूमिकेतील गौरव शिवानीच्या (वैशाली टक्कर) प्रेमात पडतो आहे असे आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवानीला मात्र अनेक कारणांमुळे त्याच्यापासून दूर राहायचे आहे. स्वत:ला अश्मितपासून दूर ठेवण्यासाठी ती तिची मामेबहीण इशा (इशा आनंद) आणि अश्मित जवळ यावे यासाठी प्रयत्न करतेय. या मालिकेची ही हटके कथा प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून या मालिकेतील व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. या मालिकेतील गौरव हा त्याच्या खऱ्या आयुष्यात फिटनेसबद्दल प्रचंड सतर्क आहे. आपला फिटनेस जपण्यासाठी त्याचा दिनक्रम हा ठरलेला असतो. त्याच्या या दिनक्रमाबद्दल गौरव वाधवा सांगतो, “एकेकाळी माझे वजन ७४ किलो होते आणि आता ते ५७ किलो आहे. हा बदल केवळ बाह्यरूप सुधारणारा नव्हता, तर मला यामुळे आतून खूप समाधान मिळाले आहे. मी सध्या एक तंदुरुस्त आयुष्य जगत आहे. त्यामुळे मला खूपच छान वाटतेय. पडद्यावर चांगले दिसण्यासाठी मी स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतो. प्रोटिन बार्स आणि उकडलेल्या भाज्या खाऊन मी तंदुरुस्ती कायम राखतो. शिवाय मी दररोज व्यायाम करतोच आणि आरोग्यपूर्ण आहारही घेतो. अर्थात रसगुल्ला हा माझा वीक पॉइंट आहे.” 

टॅग्स :गौरव वाधवा