Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुपर डान्सरने शिल्पा शेट्टीला आणखी एक पुस्तक लिहिण्यास प्रेरित केले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 13:16 IST

 शिल्पा शेट्टीच्या चाहत्यांसाठी एक खूषखबर आहे. आतपर्यंत शिल्पा आपल्याला वेगवेगळ्या भूमिकेत दिसली आहे. आता शिल्पाने एक पुस्तक लिहिण्याचा निर्णय ...

 शिल्पा शेट्टीच्या चाहत्यांसाठी एक खूषखबर आहे. आतपर्यंत शिल्पा आपल्याला वेगवेगळ्या भूमिकेत दिसली आहे. आता शिल्पाने एक पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या शिल्पा शेट्टी सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनच्या डान्स रिअॅलिटी शो, सुपर डान्सर - चॅप्टर 2मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसते आहे. मागील आणि नवीन हंगामातील सर्व सुपर डान्सर्सच्या अभूतपूर्व कामगिरीने अनोखी कामगिरी केल्यानंतर आता शिल्पा शेट्टीने एक पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये या प्रतिभावान मुलांबदद्ल लिहिण्याचा निर्णय तिने घेतला आहे. सुपर डान्सर्सच्या एका सूत्राच्या माहितीनुसार, "शिल्पा मानते की या मुलांमध्ये असलेल्या गुण कौशल्य आहेत त्याची नोंद घेणे महत्त्वाचे आहे.  या पुस्तकात, ती यात  दत्ता भांडे, दीपाली बोरकर आणि एट  यांच्या असामन्य गुणांचे उल्लेख यात करणार आहे. सुपर डान्सर - चॅप्टर 2च्या ऑडिशन दरम्यान स्पर्धकांच्या परफॉर्मन्सने  तिला आश्चर्याचा धक्का मिळाल्याचे शिल्पा या आगामी पुस्तकात मांडणार आहे. तिच्या निर्णयावर सुपर डान्सर चॅप्टर 2चे इतर परीक्षक अनुराग बासू आणि गीता पूर ही आनंदित झाले आहेत. शिल्पाने 90चा दशक आपल्या अभिनयाच्या जोरावर गाजवला होता. सध्या बॉलिवूडमधील सर्वांत फिट, स्टायलिश आणि हॉट मॉम्समध्ये शिल्पाचे नाव सामील आहे, काही दिवसांपूर्वी शिल्पा आपल्या गळ्यातील स्कार्फमुळे चर्चेत आली होती. तिच्या या स्कार्फची किंमत ३३० डॉलर २१ हजार रुपये इतकी होती. बाजीगर चित्रपटातून शिल्पाने आपल्या करिअरची सुरुवात केली. यात तिच्यासोबत शाहरुख खान आणि कजोलसुद्धा होती. 1994 साली आलेल्या आग चित्रपटात शिल्पा मुख्य भूमिकेत झळकली होती. आतापर्यंत शिल्पाने हिंदी, तमिळ आणि तेलुगू चित्रपटात काम केले आहे. जवळपास 40 चित्रपटात तिने काम केले आहे. शिल्पाचे नाव अक्षय कुमारसोबत जोडले गेले होते. शिल्पा आणि अक्षयच्या अफेअरची त्याकाळी खूप चर्चासुद्धा झाली होती. मात्र अक्षयने लग्न केले ट्विंकल खन्नासोबत तर 2009 मध्ये शिल्पा ही राज कुंद्रासोबत विवाह बंधनात अडकली. शिल्पा आणि राज यांच्या मुलाचे नाव विवान आहे. गेल्या काही वर्षांपासून शिल्पा चित्रपटात झळकली नाही आहे.