Join us

सुपर डान्सर २ चा विजेता बिशाल शर्माला मिळाली इतकी मते

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 10:04 IST

आसामच्या १२ वर्षीय बिशाल शर्माला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपर डान्सर २ या सुपरहिट डान्स रिअॅलिटी शोचे विजेतेपद नुकतेच मिळाले. ...

आसामच्या १२ वर्षीय बिशाल शर्माला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपर डान्सर २ या सुपरहिट डान्स रिअॅलिटी शोचे विजेतेपद नुकतेच मिळाले. त्याला तब्बल १२ दशलक्ष मते मिळाली. त्याच्या मागोमाग देहारादूनचा आकाश थापा, पानिपतची वैष्णवी प्रजापती आणि कानपूरचा रितीक दिवाकर यांना मते मिळाली. सुपर गुरू शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि अनुराग बसू यांनी बिशालला ‘डान्स का कल’ खिताब देऊन गौरवले. बिशालला सुपर डान्सरच्या ट्रॉफीसोबत १५ लाख रुपये आणि पीसी ज्वेलर्सकडून एक विशेष भेटवस्तू देण्यात आली. या फिनालेमध्ये प्रेक्षक परीक्षक बनले होते आणि परीक्षक प्रेक्षक बनले होते. मतदानाचे परिणाम देखील वेळोवेळी जाहीर करण्यात येत होते, ज्यामुळे प्रेक्षकांना हे समजत होते की, त्यांचा आवडता स्पर्धक किती पुढे किंवा मागे आहे. असे पहिल्यांदाच घडले की परीक्षकांनी नाही तर भारतातील जनतेने सोनी LIV अॅप वर लाइव्ह मतं देऊन विजेत्याची निवड केली. या लाईव्ह मतदानातून या कार्यक्रमाला आणि स्पर्धकांना ३४ दशलक्ष लाइव्ह मते मिळाली. या विजयाने भारावलेला बिशाल सांगतो, “सुपर डान्सर 2 मध्ये ‘डान्स का कल’ हा खिताब जिंकल्यामुळे मी खूप खूश झालो आहे. माझ्या क्षमतेबद्दल विश्वास दाखविल्याबद्दल मी माझे परीक्षक, माझा नृत्यदिग्दर्शक आणि सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा खूप आभारी आहे. या सर्वांच्या मदतीने आणि मार्गदर्शनामुळेच मी हे साध्य करू शकलो आहे आणि माझ्या आई-वडिलांना माझा अभिमान वाटण्यास पात्र ठरलो.” भारतातील सर्वोत्कृष्ट नृत्य प्रतिभेचा शोध घेताना १२ नर्तकांना सुपर डान्सरच्या ‘डान्स का कल’ या खिताबासाठी स्पर्धा करण्याची सुवर्ण संधी मिळाली होती. अटीतटीच्या स्पर्धेत टिकून २६ आठवडे आपल्या प्रतिभेस अधिक झळाळी देऊन आकाश थापा, बिशाल शर्मा, रितीक दिवाकर आणि वैष्णवी प्रजापती सुपर फिनालेपर्यंत धडक देण्यात यशस्वी झाले होते. सुपर डान्सरच्या फिनालेला कार्यक्रमाचे स्पर्धक शिल्पा शेट्टी आणि गीता कपूर यांनी देखील त्यांचे नृत्य सादर केले. तसेच या विशेष भागासाठी वरुण धवन अतिथी परीक्षक म्हणून उपस्थित होता. Also Read : गणेश आचार्यने एकावेळी खालल्या होत्या २०० इडल्या