Join us
Daily Top 2Weekly Top 5

सनी लिओनी आणि रणविजय सिंग 'स्प्लिट्सविला एक्‍स ३'मधून येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 18:24 IST

सनी लिओनी आणि रणविजय सिंग एमटीव्ही स्प्लिट्सविला एक्‍स ३मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सनी लिओनी आणि रणविजय सिंग एमटीव्ही स्प्लिट्सविला एक्‍स ३मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ६ मार्चपासून दर शनिवारी सायंकाळी ७ वाजता नवीन सीझन एमटीव्हीवर प्रेक्षकांना पहायला मिळेल.

 केरळमधील पूवर आयलँड्सच्‍या नयनरम्‍य ठिकाणी अगदी योग्‍य परिसर व योग्‍य वातावरणामध्‍ये शूट करण्‍यात आलेल्‍या 'एमटीव्‍ही स्प्लिट्सविला एक्‍स३'मध्‍ये ९ मुले व १२ मुली एक नव्‍हे तर दोन वेगवेगळे व्हिलाज: सिल्‍व्‍हर व गोल्‍डमध्‍ये त्‍यांच्‍या प्रेमाचा शोधाचा अनोखा प्रवास सुरू करतील. सिल्‍व्‍हर व्हिलामध्‍ये स्‍पर्धक सर्व लेबल्‍स काढून कोणतीही कटिबद्धता किंवा ''टॅग्‍स''मागील नात्‍यांचा शोध घेताना दिसतील, तर गोल्‍ड व्हिलामध्‍ये कटिबद्धता महत्त्वाची असेल. एकीकडे प्रेम खोडकर असेल, तर दुसरीकडे ते सुरेख असेल. 

रणविजय सिंग आणि सनी लिओनी ही जोडी सातव्यांदा सूत्रसंचालकांच्‍या भूमिकेत परतले आहे. १३वे पर्व सुरू होण्‍यासाठी सज्‍ज असलेला  रणविजय सिंग म्‍हणाला, ''वर्षानुवर्षे एमटीव्‍ही स्प्लिट्सविलाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि तरुणांचे हृदय व मनामध्‍ये खास स्‍थान निर्माण केले आहे. नवीन थीम्‍स व आव्‍हानांसह स्‍पर्धकांचा वैविध्‍यपूर्ण समूह प्रत्‍येक पर्वामध्‍ये प्रेमावरील विभिन्‍न पैलूंना सादर करतो आणि माझा विश्‍वास आहे की, हीच विविधता शोला पुढे जाण्‍यामध्‍ये आणि जनरेशन झेडचे लक्ष वेधून घेण्‍यामध्‍ये कारणीभूत ठरते. अद्वितीय वर्षानंतर आम्‍ही धमाल व उत्‍साहाचा स्‍तर दुप्‍पट करण्‍याचा प्रयत्‍न करत आहोत, जे आमच्‍या थीममधून देखील दिसून येत आहे. शोला मिळालेले प्रेम व पाठिंब्‍यासाठी आम्‍ही चाहत्‍यांचे जितके आभार मानू ते कमीच आहे. सनी आणि मी आणखी एका संस्‍मरणीय पर्वासाठी उत्‍सुक आहोत.'' 

सनी लियोनी म्‍हणाली, ''माझ्या मते, स्प्लिट्सविला या शोने जनरेशन झेडसाठी डेटिंग व नात्‍याला पुनर्परिभाषित केले आहे. प्रेमासंबंधी आपल्‍या निवडी व पैलू सतत सर्वसमावेशक होत असताना अर्थपूर्ण नाते निर्माण होण्‍याचा विचार या शोचे सार कायम ठेवतो. अनेक पर्वांमध्‍ये रणविजय व मला सर्वात वैविध्‍यपूर्ण व उत्‍साही व्‍यक्‍तींना भेटण्‍याचा आणि त्‍यांना प्रेमाच्‍या शोधामध्‍ये मार्गदर्शन करण्याचा निखळ आनंद मिळत आला आहे. आम्‍ही एमटीव्‍ही स्प्लिट्सविला एक्‍स३सह आणखी एका संपन्‍न प्रवासामध्‍ये याच उत्‍साहाची पुनरावृत्ती करण्‍यास उत्‍सुक आहोत. यंदाच्‍या थीममध्‍ये अनेक गोष्‍टी आहेत आणि निश्चितच प्रेक्षक शो कडे आकर्षित होतील. आम्‍ही एका उत्‍साहपूर्ण पर्वासाठी सज्‍ज आहोत.''एमटीव्‍ही स्प्लिट्सविला एक्‍स३ ने डिसेंबर महिन्‍याच्‍या सुरूवातीला पहिल्‍यांदाच लाइव्‍ह ऑडिशन्‍स सुरू केले आणि प्रेक्षकांनी या गोष्‍टीला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिला. तसेच मोहक सौंदर्यवती नेहा धुपिया व विद्या मलावदे या देखील यामध्‍ये सामील झाल्‍या आणि त्‍यांनी स्‍पर्धकांना प्रोत्‍साहित केले. ऑनलाइन ऑडिशन्‍समध्‍ये मुंबईकर समृद्धी जाधव व व्‍योमेश कौल यांनी शोमध्‍ये प्रवेश मिळवला आणि ते या अनोख्या स्‍पर्धेमध्‍ये इतर स्‍पर्धकांसोबत स्‍पर्धा करताना दिसतील.  

टॅग्स :सनी लिओनी