Join us
Daily Top 2Weekly Top 5

​पोरस मालिकेतील सनी घनशानीला मेकअप करण्यासाठी लागतो दोन तासाहून अधिक वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 12:18 IST

पोरस राजाच्या आयुष्यावर आधारित पोरस ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेच्या कथानकाचे, ...

पोरस राजाच्या आयुष्यावर आधारित पोरस ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेच्या कथानकाचे, या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेचे प्रेक्षक कौतुक करत आहे. या मालिकेची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनात या मालिकेविषयी चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती. ही मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद या मालिकेला मिळत आहे. या मालिकेत फिलिपची भूमिका सनी घनशानी साकारत आहे. या मालिकेसाठी तो सध्या चांगलीच मेहनत घेत आहे. या मालिकेत फिलिपला केवळ एक डोळा असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे त्याला नेहमीच आपला उजवा डोळा बंद ठेऊनच नेमबाजी करावी लागते. या मालिकेचे चित्रीकरण दिवसातील कित्येक तास सुरू असते. यामुळे इतका वेळ एक डोळा झाकून ठेवणे हे सनीसाठी खूपच कठीण असते. या मालिकेच्या व्यक्तिरेखेसाठी त्याला कित्येक तास मेकअप करण्यासाठीच जातात. याविषयी सनी सांगतो, “इतक्या भव्य मालिकेचा मी भाग होऊ शकलो याचा मला आनंद होत आहे. फिलिपची भूमिका साकारणे हे माझ्यासाठी सोपे नाहीये. कधी कधी आम्ही सलग १६ तास काम करतो. माझ्या डोळ्याला नुकसान होऊ नये, यासाठी मी चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी आणि चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर नियमितपणे काही व्यायाम करतो. पॅक-अप झाल्यानंतर मी माझ्या व्हॅनिटी व्हॅनमधील दिवे बंद करून १५ मिनिटे डोळे मिटून शांत बसतो. योग्य झोप घेणे देखील माझ्यासाठी गरजेचे आहे. डोळ्यावर केलेल्या मेकअपमुळे तर मला खूप त्रास होतो, विशेषतः जेव्हा मला घाम येतो तेव्हा तर असह्य होते. कारण डोळ्याभोवती आलेला घाम पुसण्यासाठी मी ते डोळ्याला लावलेले ढापण काढू शकत नाही. ते ढापण ठेवून मेकअप करायला मला दोन तास लागतात.”पोरस या मालिकेच्या आगामी भागामध्ये पौरव राष्ट्रातून पर्शियन लोकांचा व्यापार नष्ट करून त्यांना देशाबाहेर हाकलण्याची एक योजना पोरस आखणार आहे. पोरस ही योजना कशाप्रकारे आखणार हे प्रेक्षकांना आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. Also Read : पोरसची अभिनेत्री रिया दीपसी तिच्या बॅगमध्ये ठेवते या गोष्टी