सुनील लवकरच छोट्या पडद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 17:13 IST
सुनील बर्वेला प्रेक्षकांना पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. लेक माझी लाडकी या मालिकेत लवकरच सुनीलची एंट्री होणार ...
सुनील लवकरच छोट्या पडद्यावर
सुनील बर्वेला प्रेक्षकांना पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. लेक माझी लाडकी या मालिकेत लवकरच सुनीलची एंट्री होणार आहे. कावेरीच्या भूतकाळात गोष्टी घडल्या आहेत हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. याच भूतकाळात घडलेल्या घटना आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कावेरीचा भूतकाळ प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. सुनील या मालिकेत कावेरीच्या प्रियकराची भूमिका साकारणार असल्याचे कळतेय.