सुनिधी चौहान आणि प्रितम कमलीनंतर पुन्हा एकत्र येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 16:07 IST
स्टारप्लसवर आता सर्वांत अफलातून संगीत रिअॅलिटी शो दिल है हिंदुस्तानी २ पुन्हा सुरू होणार आहे.ह्या सीझनमध्ये याच्या परीक्षक मंडळात ...
सुनिधी चौहान आणि प्रितम कमलीनंतर पुन्हा एकत्र येणार
स्टारप्लसवर आता सर्वांत अफलातून संगीत रिअॅलिटी शो दिल है हिंदुस्तानी २ पुन्हा सुरू होणार आहे.ह्या सीझनमध्ये याच्या परीक्षक मंडळात प्रितम, सुनिधी चौहान आणि बादशाह हे संगीत उद्योगातील हिरे दिसून येतील. 'दिल है हिंदुस्तानी'च्या सोलो, ड्युओ आणि ग्रुप सिंगर्समधून जादुई आवाज शोधून काढण्यासाठी हे सगळेच उत्साहात आहेत.हल्लीच ह्या शो च्या भागाचे चित्रीकरण करताना प्रितम यांना सुनिधी चौहानसोबत काम करताना जुने दिवस आठवले. त्यांनी धूम ३ साठी कमली ह्या गाण्यासाठी सुनिधीसोबत काम केले होते. ते दोघे अनेकदा वेगवेगळ्या चालींवर गाणी गाऊन जॅमिंग सेशन्स करत असत. आता 'दिल है हिंदुस्तानी २' साठी पुन्हा एकदा सुनिधीसोबत काम करायला मिळणार असल्याने प्रितम खूपच उत्साहात आहेत.“सुनिधीसोबत काम करताना नेहमीच खूप छान वाटते.आम्ही 'धूम 3', चॉकोलेट, गरम मसाला आणि अशा अनेक चित्रपटांसाठी मस्त काम केले आहे. दिल है हिंदुस्तानी २ चा मंच आमच्यासाठी कमलीनंतरचा रियुनियनचा मंच आहे. ह्या इंडस्ट्रीला उत्तम आवाज मिळवून देण्याच्या आमच्या ह्या शोधामध्ये तिच्यासोबत काम करताना मला मजा येईल यात शंकाच नाही.” असे प्रितम म्हणाले. प्रीतमने यासंदर्भात सांगितले, “दिल है हिंदुस्तानी’ या कार्यक्रमात केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील विविध गायक एकाच व्यासपिठावर आपली कला सादर करतात. त्यावेळी आम्हाला अनेक प्रकारचे आवाज ऐकायला मिळतात. अशा या कार्यक्रमात एक परीक्षक म्हणून काम करण्यास मी खूपच उत्सुक झालो आहे. तसंच यामुळे मला माझ्या भावी प्रकल्पासाठी नवा दर्जेदार गायकही मिळू शकेल. खरं तर या चित्रपटसृष्टीत तसा मीसुध्दा एक बाहेरचाच माणूस आहे. त्यामुळे या क्षेत्रात जम बसविणं किती अवघड असतं, त्याची मला कल्पना आहे. म्हणूनच या क्षेत्राबाहेरील गुणवान गायकांना जास्तीत जास्त संधी देण्याचा मी प्रयत्न करीत आहे. मी एका आगळ्या आवाजाच्या शोधात आहे.एकदा मला तो आवाज सापडला की माझी टीम त्याला माझ्या प्रोजेक्टसाठी तयार करणार आहे.”