Join us

सुदीप साहिर पत्नी अनंतिकासह थायलंडमध्ये करतोय एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 13:27 IST

टीव्ही अभिनेता सुदीप साहिर आणि त्याची पत्नी अनंतिका साहिर सध्या थायलँडमध्ये क्वॉलिटी टाईम स्पेंड करताना दिसतायेत. खुद्द सुदीपनेच पत्नी ...

टीव्ही अभिनेता सुदीप साहिर आणि त्याची पत्नी अनंतिका साहिर सध्या थायलँडमध्ये क्वॉलिटी टाईम स्पेंड करताना दिसतायेत. खुद्द सुदीपनेच पत्नी अवंतिकासह क्लिक केलेले व्हॅकेशन फोटो त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत. फोटोत दोघांचीही कुल अंदाज पाहायला मिळतोय. याशिवाय शेअर केलेल्या फोटोला सुदीपने समर्पक असे कॅप्शनही दिले आहे.फोटोत पत्नीचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय.मुलासोबत अवंतिका आणि सुदीप मस्त फुल ऑन एन्जॉय करताना दिसतायेत. सुदीपने 'क्यों होता है प्यार','जब लव्ह हुआ','संतान','मै लक्ष्मी तेरी आँगन की','शास्त्री सिस्टर्स','ओ अपना सा' यासारख्या मालिकेत झळकला होता. फिक्शन शो ‘वो… अपना सा’मध्ये सुदीप आदित्य जिंदलची भूमिका साकरात आहे. तसेच 2014 साली प्रदर्शित झालेला 'लेकर हम दिवाना दिल' या सिनेमातही तो झळकला होता. सुदीपला अभिनयाव्यतिरिक्त ज्योतिषशास्त्रातही  खुप रस आहे. ज्योतिषशास्त्राची अनेक पुस्तकंही तो वाचत असल्याचे त्याने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते.तसेच तो त्याच्या मित्र मंडळी आणि फॅमिलीमेंबर्सची पत्रिकाही तो पाहतो. त्याचा ज्योतिषशास्त्रावर खूप विश्वास आहे.अंकशास्त्रानुसार त्याने त्याच्या नावात बदल केला आहे, पत्नीच्या नावातही बदल केल्याचे तो सांगतो. ज्या गोष्टीत आपला पूर्ण विश्वास आहे त्या गोष्टी पूर्ण करण्यावर माझा भर असतो.बरेच जणांना अंकशास्त्र,जन्मपत्रिका बघणे या गोष्टी पटत नसल्याचे आपण पाहातो.पण काही गोष्टी सकारात्मत उर्जा मिळवण्यासाठी कराव्यात असे सुदीपने एका मुलाखतीत म्हटले होते.सध्या मालिकेचे शूटिंग या सगळ्या गोष्टी बाजुला सारत सुदीप फॅमिलीसह व्हॅकेशन एन्जॉय करतो,त्यामुळे रिफ्रेश होवून पुन्हा जोमाने कामाला सूरुवात करणार असल्याचे त्याने म्हटले आहे.