Join us

'सुंदर आमचे घर'मधील प्रणालीची लेक आहे प्रसिद्ध बालकलाकार, या लोकप्रिय मालिकेत करतेय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 07:00 IST

Sundar Amche Ghar : 'सुंदर आमचे घर' या मालिकेत प्रणालीची सोज्वळ भूमिका अभिनेत्री वेदश्री दळी(Vedashri Dali)ने साकारली आहे.

सोनी मराठी वाहिनीवरील सुंदर आमचे घर (Sundar Amche Ghar) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सासू सून नणंद यांच्यामधील भांडणांना आणि कटकारस्थानाला बगल देत, प्रेमळ सासू सुनेचे आई मुली सारखे नाते यात पहायला मिळत आहे. या मालिकेत प्रणालीची सोज्वळ भूमिका अभिनेत्री वेदश्री दळी(Vedashri Dali)ने साकारली आहे. आईजींच्या कचाट्यातून सुभद्राकाकूला वाचवण्यासाठी प्रणाली नेहमीच पुढाकार घेताना दिसते. फार कमी जणांना माहित आहे की, वेदश्री दळीची लेक प्रसिद्ध बालकलाकार आहे. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात ना.

वेदश्री दळी ही मालिका चित्रपट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. झी मराठीवरील मालिका स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सकवार बाईंची भूमिका वेदश्रीने केली होती. अरे सोडा बाई बाटली या चित्रपटात देखील तिने काम केले होते. कलर्स मराठीवरील श्री स्वामी समर्थ या मालिकेत मालोजीराजेंच्या पत्नीची भूमिका तिने साकारली होती. 

वेदश्री दळीची लेक देखील मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध बालकलाकार म्हणून नावारूपाला आली आहे. स्पृहा दळी (Spruha Dali) हे तिच्या मुलीचे नाव आहे. रंग माझा वेगळा या लोकप्रिय मालिकेत ती दीपिकाची भूमिका निभावते आहे. स्पृहाची बालकलाकार म्हणून ही पहिलीच मराठी मालिका आहे. या भूमिकेमुळे स्पृहा प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे.