Join us

"माझ्या कारसमोर घाणेरडे चाळे...", सुमोना चक्रवर्तीला मुंबईत भर दुपारी आला भयानक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 08:58 IST

मराठा आंदोलक मुंबईतील रस्त्यावर... सुमोना चक्रवर्तीची पोस्ट

सध्या मुंबईत अनेक मराठा बांधव एकत्र आले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी लाखो मराठ बांधव एकवटले आहेत. मोठ्या प्रमाणात त्यांची गर्दी झाल्याने मुंबईत रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. इतकंच नाही तर सामान्यांचे हाल होत आहेत. अनेक मराठा बांधवांनी गैरवर्तन केल्याचाही प्रकार घडला आहे. कपिल शर्मा शो फेम अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती(Sumona Chakravarti) हिच्यासोबत भर दुपारी झालेला भयानक प्रकार तिने सोशल मीडियावरुन मांडला आहे.

सुमोना चक्रवर्तीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले, "आज दुपारी साडेबाराची वाजताची गोष्ट. मी कुलाबा वरुन फोर्टला जात होते. अचानक मोठ्या संख्येने लोकांनी समोर येत माझी कार अडवली. भगवा रंगाचा गमछा घातलेल्या एका माणसाने चक्क माझ्या कारच्या बोनेट आदळआपट केली. वर हसतही होता. त्याचं पुढे आलेलं पोट माझ्या कारवर घासत होता. माझ्यासमोर तो अक्षरश: हलत डुलत होता.  त्याच्यासोबतचे माझ्या कारच्या आरश्याजवळ येऊन जय महाराष्ट्र असं ओरडत होते आणि हसत होते. आम्ही थोडं पुढे गेलो आणि पुन्हा तेच झालं. पाच मिनिटात दोन वेळा माझ्यासोबत तेच झालं. एकही पोलिस तिथे हजर नव्हते.(नंतर आम्ही पाहिलं की काही पोलिस होते मात्र ते फक्त बसले होते, गप्पा मारत होते आणि काहीही करत नव्हते). कायदा आणि सुव्यवस्थाच नाही. मला माझ्या कारमध्ये भर दुपारी साऊथ मुंबईमध्ये असुरक्षित वाटत होतं."

ती पुढे लिहिते, "आणि रस्त्यांची अवस्था तर काय? केळ्यांची सालं, प्लास्टिक बॉटल, घाण. फुटपाथही वाईट अवस्थेत होते. आंदोलनकर्ते आंदोलनाच्या नावाखाली तिथेच खात होते, झोपले होते, अंघोळही करत होते, जेवण बनवत होते, थुंकत होते, घाण करत होते, व्हिडिओ कॉल, रील्स बनवत होते आणि मुंबई दर्शन करत होते. नागरी सुव्यवस्थेची थट्टाच सुरु आहे".

पुढे सुमोनाने कॅप्शनमध्ये लिहिले, "ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था वाटत नाही. प्रगतशील समाज वाटत नाही. ते बोलतात तो डिजिटल भारत हा नाही. कारण जेव्हा जातीयवाद, धर्मवाद, राजकारण, भ्रष्टाचार, नोकरशाही, निरक्षरता आणि बेरोजगारी चं चित्र दिसत असतं तो विकास नाही. हा नाश आहे."

टॅग्स :सुमोना चक्रवर्तीटिव्ही कलाकारमुंबईमराठामराठा आरक्षणमनोज जरांगे-पाटील