सुमीत हसवण्यास झाला सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 15:47 IST
सुमीत कौलने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. पण पहिल्यांदाच प्रेक्षकांना तो एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. ...
सुमीत हसवण्यास झाला सज्ज
सुमीत कौलने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. पण पहिल्यांदाच प्रेक्षकांना तो एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. बहू हमारी रजनी_कांत या मालिकेत तो एक विनोदी भूमिका साकारणार आहे. या मालिकेत बबल्स आत्याच्या पतीच्या भूमिकेत तो झळकणार आहे. सुमीतला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि मशिनची भीती वाटते असे दाखवण्यात आले आहे. या त्याच्या भीतीमुळे प्रेक्षकांना खळखळून हसायला मिळणार आहे. प्रथमच एक सकारात्मक आणि विनोदी भूमिका साकारायला मिळत असल्याने सध्या तो चांगलाच खूश आहे.