Join us
Daily Top 2Weekly Top 5

मालिकेत रंगणार अनु सिद्धार्थचा विवाह सोहळा, अनुच्या मेहंदीचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 15:26 IST

अनुच्या हातावर सिद्धार्थच्या नावाची मेंदी रंगणार आहे. खूप दिवसांपासून प्रेक्षक या दिवसाची वाट बघत होते आणि त्या प्रवासाची आता सुरुवात झाली आहे.

'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मालिकेमध्ये सिद्धार्थच्या अपघाताने मालिकेला नवे वळण आणले आहे. सिद्धार्थच्या अपघातानंतर दुर्गा थेट अनुच्या घरी पोहचली आणि तिने अनुसमोर सिद्धार्थचा जीव वाचवावा म्हणून मदत मागितली. अनु सिद्धार्थला भेटण्यास तयार झाली, आणि सगळे चित्र बदलले. अनुने सिद्धार्थसोबत लग्न करण्यास होकार दिला आहे. सिद्धार्थच्या तब्येतीमध्ये हळूहळू सुधार होत आहे. मालिकेमध्ये लवकरच सिद्धार्थ आणि अनुचा विवाह सोहळा बघायला मिळणार असून त्याची तयारी आता सुरु झाली आहे . अनुच्या हातावर सिद्धार्थच्या नावाची मेंदी रंगणार आहे. खूप दिवसांपासून प्रेक्षक या दिवसाची वाट बघत होते आणि त्या प्रवासाची आता सुरुवात झाली आहे. मेंदीच्या फोटोज मध्ये मृणाल म्हणजेच अनु खूपच सुंदर दिसत आहे. सिद्धार्थ आणि अनुचे एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे, आणि आता हे दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत.

 

सिद्धार्थ आणि अनुच्या नात्याला अनेक छटा आहेत. सिध्दार्थच्या नकळत अनु बरोबरच्या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. दुर्गाला हे कळताच तिने अनुला सिध्दार्थच्या आयुष्यातून काढून टाकण्याचे बरेच प्रयत्न केले, बरीच कट कारस्थान केली पण त्याचा काहीच उपयोग झाली नाही. सानवीने देखील अनुला सिद्धार्थपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. पण कुठेतरी अनुचा चांगुलपणा, साधेपणा सिध्दार्थला पटला आणि तो तिच्या प्रेमात पडला. 

 

 प्रेमाखातर माणूस कुठल्याही आव्हानाला, कुठल्याही परीक्षेला सामारो जातो. ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्यासाठी कुठलाही त्याग करायला तयार असतो. सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकेमध्ये देखील सिध्दार्थचा प्रेमाच्या वाटेवरचा प्रवास आता सुरु झाला आहे. 

टॅग्स :मृणाल दुसानीसशशांक केतकरकलर्स मराठीहे मन बावरेहे मन बावरे