Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सुख म्हणजे नक्की काय असतं'चे शूटिंग होणार या राज्यात, पहा मालिकेचा नवीन सेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 07:00 IST

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या शूटिंगला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे संसर्गाची चेन ब्रेक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठोर निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे. राज्याची वाटचाल पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने होत आहे. अशात मनोरंजनाला ब्रेक लागू नये, यासाठी वाहिन्यांकडून खबरदारी घेतली जात आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील दैनंदिन मालिकांचे शूट आता महाराष्ट्राबाहेर होणार आहे. स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचे शूटिंग गोव्यात होणार आहे. 

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या शूटिंगला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वच मालिकांचे चित्रीकरण थांबवले गेले होते. मात्र आता या मालिकेचे नवीन भाग लवकरच प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या मालिकेचे शूटिंग आता गोव्यात नुकतेच सुरू झाले असून गौरी आणि जयदीपची ही आवडती जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीलाही येत आहे. 

गोव्यात नुकतेच मालिकेचे चित्रीकरण सुरू झाले असून या मालिकेच्या सेटवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. गोव्यातील मालिकेचे शूट जेथे केले जात आहे त्या घराचा परिसर निसर्गाने व्यापलेला दिसून येत आहे. घराच्या सभोवतालची गर्द हिरवीगार झाडी साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे मालिकेतील कलाकारांनाही इथे काम करायची खूपच उत्सुकता लागून राहिली आहे.

सेटवरील दिलेल्या ह्या फोटोवरूनच मालिकेचा हा सेट कसा असेल हे तुमच्या लक्षात येईल. येत्या काही दिवसातच मालिकेतील हा बदल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

टॅग्स :स्टार प्रवाहकोरोना वायरस बातम्यागोवा