'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. आतापर्यंत या मालिकेत गौरीच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. मात्र, प्रत्येक पावलावर तिला माईंनी मदत केली. यावेळीदेखील गौरी घरात खोटं सोंग घेऊन वावरत आहे. मात्र, गौरी आणि माईंनी रचलेला हा प्लॅन आता शालिनी उघड करणार आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये शालिनी गौरीचं सत्य उघड करणार आहे. गौरीची स्मृती गेली नसून ती खोटं ढोंग करते हे सत्य ती सगळ्यांसमोर आणणार आहे. त्यामुळे आता या मालिकेत आणखी एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, गौरीला जीवे मारण्याचा प्रयत्न नेमका कोणी केला हे शोधण्यासाठी आणि त्याला व्यक्तीला अद्दल घडवण्यासाठी गौरीने स्मृती गेल्याचं नाटक केलं आहे. तसंच तिच्या हत्येच्या कटामागे शालिनीचा हात असल्याचंही तिला आणि माईला माहित आहे. त्यामुळे सध्या गौरी सध्या घरात खोटं नाटक खेळत आहे. मात्र, माई समजून गौरी तिचं सत्य चुकून शालिनीला सांगते. त्यामुळे आता हेच सत्य शालिनी घरातील इतर सदस्यांना सांगणार आहे.