Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतल्या मल्हारची खऱ्या आयुष्यातली शालिनी दिसायला आहे फार सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 09:00 IST

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तीरेखा विशेष आणि खास आहे. प्रत्येक व्यक्तीरेखेनं रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेचे दमदार कथानक आणि कलाकरांच्या उत्तम भूमिका यामुळे अल्पावधीतच मालिकेने रसिकांची पसंती मिळवली होती. यातील प्रत्येक व्यक्तीरेखा विशेष आणि खास आहे. प्रत्येक व्यक्तीरेखेनं रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.या मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात त्यामुळे प्रत्येक कलाकाराविषयी जाणून घेण्यात चाहत्यांनाही नेहमीच उत्सुकता असते.मालिकेचं कथानक सध्या रंगतदार वळणावर आलं आहे. त्यामुळे रसिकही मालिकेला खिळून असतात. या मालिकेमध्ये जयदीप आणि गौरी ही जोडी रसिकांची आवडती जोडी बनली आहे. 

अगदी त्याचप्रमाणे शालिनी आणि मल्हार ही जोडीसुद्धा रसिकांची आवडती जोडी आहे. मल्हार ही भूमिका साकारणारा अभिनेता कपिल होनराव मालिकेमुळे वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. कपिल रसिकांचा लाडका अभिनेता बनला आहे. सोशल मीडियावरही तो सक्रीय असतो. फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. सोशल मीडियावर प्रचंड मोठा त्याचा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. 

दिवसेंदिवस त्याचीही लोकप्रियता वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. ऑनस्क्रीन मल्हारच्या शालिनी तर सगळ्यांनी पाहिलीच आहे. मात्र मल्हारच्या खऱ्या आयुष्यातली शालिनीसुद्धा दिसायला फार सुंदर आहे. त्याच्या पत्नीचे नाव रेणू होनराव असे आहे. ऑनस्क्रीन शालिनी प्रमाणेच रेणू सुंदर दिसते.सोशल मीडियावर नजर टाकल्यास दोघांचेही फोटो लक्ष वेधून घेत असतात.

अभिनेत्रींनाही लाजवेल इतकी ती सुंदर दिसते. सोशल मीडियावर दोघांचे एकत्र फोटो पाहायला मिळतात. चाहते या दोघांच्या फोटोंनाही प्रचंड पसंती देत असल्याचे पाहायला मिळते. दोघेही सोशल मीडियावर कपल गोल देत असल्याचे पाहायला मिळते. विशेष म्हणजे कपिलच्या प्रत्येक निर्णयात ती पाठिशी असते. कपिलचे करिअर घडवण्यातही तिचा मोलाचा वाटा आहे. सह्याद्री वाहिनीवरील “मर्म बंधातली ठेव “ही त्याची पहिली मालिका असून त्यानंतर त्याने अनेक मालिकेत काम केले आहे.  छोट्या पडद्यासह कपिलनं मोठ्या पडद्यावरही मराठी सिनेमात भूमिका साकारली आहे.  'कर्म चक्र' या मराठी सिनेमातही त्याने काम केले आहे.