Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेमधील या अभिनेत्याने लॉकडाउनमध्ये सुरू केला बिझनेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 20:07 IST

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील जयदीप-गौरीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावते. इतकेच नाही तर या दोघांशिवाय या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत अभिनेते सुनील गोडसे यांनी साकारलेली दादासाहेबांची भूमिका फणसाप्रमाणे बाहेरून कडक आणि आतून प्रेमळ अशी आहे. त्यांच्या भूमिकेची प्रेक्षकांकडून प्रशंसा होत असते. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, सुनील गोडसे यांनी लॉकडाउनमध्ये नवीन बिझनेस सुरू केला आहे. त्यांनी स्वतःची अॅक्टिंग एकाडमी सुरू केली आहे.

अभिनेते सुनील गोडसे सोशल मीडियावर सक्रीय आहेत आणि या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडिया इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यांनी स्वतःची अ‍ॅक्टिंग अकाडमी सुरू केली आहे. ज्याचे नाव अथांग अ‍ॅक्टिंग अकाडमी असे ठेवण्यात आले आहे. १० एप्रिल, २०२१ पासून पहिल्या बॅचला सुरूवात झाली आहे. या अकाडमीत वयाच्या १५ वर्षांवरील लोकांना प्रवेश मिळणार आहे आणि मान्यवरांचे मार्गदर्शन मिळणार आहे. 

सुनील गोडसे यांनी वादळवाट, राजा शिवछत्रपती यासारख्या बऱ्याच मालिकेत काम केले आहे. पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतही त्यांनी काम केले आहे. सिंबा, हायजॅक, काबूल एक्स्प्रेस या चित्रपटात काम केले आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत नुकतीच गौरी नव्या रुपात पहायला मिळाली. हा मेकओव्हर दुसरं कोणी नव्हे तर तिचा नवरा जयदीपने केले आहे.

गौरीला जयदीपसोबत एका पार्टीमध्ये जातात आणि त्यासाठी तो गौरीला तयार करतो. पार्टीत गौरी आपल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेते. 

टॅग्स :स्टार प्रवाह